Haryana Assembly Election Voting: हरियाणात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 61% मतदान

Haryana Assembly Election Voting: हरियाणामध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा आणि काँग्रेसचे विनेश फोगट आणि जेजेपीचे दुष्यंत चौटाला यांच्यासह एकूण १०३१ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. त्यापैकी 464 अपक्ष उमेदवार आहेत. या निवडणुकीत २ कोटींहून अधिक मतदार मतदान करणार आहेत. सत्ताधारी भाजप राज्यात विजयाची हॅट्ट्रिक करेल, तर काँग्रेस दशकभरानंतर पुनरागमन करेल, अशी आशा आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने भाजप, काँग्रेस, आप, INLD-BSP आणि JJP-आझाद समाज पक्ष यांचा सहभाग आहे. निवडणुकीची मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार आहे.
#HaryanaAssemblyElection2024 | Haryana recorded 61.00 % voter turnout till 5 pm, as per the Election Commission of India. pic.twitter.com/nFtVXNp39a
— ANI (@ANI) October 5, 2024
हरियाणात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 61 टक्के मतदान –
हरियाणातील 90 विधानसभा जागांसाठी शनिवारी (5 ऑक्टोबर) सायंकाळी 5 वाजेपर्यंत 61 टक्के मतदान झाले. राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर काँग्रेस दशकानंतर पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. मुख्य निवडणूक अधिकारी पंकज अग्रवाल यांनी सांगितले की, मतदान प्रक्रिया शांततेत झाली.





