Actor Elvish Yadav : मित्रानंतर आता एल्विश यादवच्या घरावर गोळीबार; तब्बल 20 ते 25 राऊंड फायर, घटनेने खळबळ…

Actor Elvish Yadav : प्रसिद्ध कॅामेडियन कपिल शर्मा याच्या कॅनडा, सरे येथील कॅप्स कॅफेवर दोन वेळा गोळीबार केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर पोस्ट करत हल्लेखोरांनी या गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर कपिलच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. मुंबई पोलिसांकडून कपिलला पोलिस प्रोटेक्शन दिले गेले आहे.
अशातच आता बिग बॅास विजेता प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेता एल्विश यादव याच्या निवासस्थानावर गोळीबाराची घटना घडली आहे. गुरुग्राममधील सेक्टर ५७ मध्ये पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञातांनी हा गोळाबार केला आहे.
तब्बल २० ते २५ गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने गोळीबारीच्या घटनेवेळी घरात एल्विश यादव नव्हता, त्यामुळे कुणीली जखमी झालं नाही. या गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच गुरुग्राम पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्ही फूटेजची तपासणी सुरू करण्यात आली असून, हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे काम केलं जात आहे.
दोन गोळीबाराच्या घटना
गेल्या काही दिवसांपूर्वी गुरुग्राम परिसरातच बॉलिवूड गायक फाजिलपुरीयावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता. याच परिसरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलं जात आहे. राहुल फाजिलपुरिया आणि एल्विश यादव हे एकमेकांचे मित्र आहेत. यामुळे आता खंडणी वसूल करण्यासाठी अशा प्रकारे गोळीबार केला जात असल्याच्या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा : ‘आता वय झालं रिटायरमेंट घे!’; नेटकऱ्याने खिल्ली उडवताच शाहरुखने दिले सडेतोड उत्तर





