Delimitation Politics : मोदी सरकारचं जवळपास काठावर बहूमत; काॅंग्रेसने केला मोठा ठराव, राजकारण तापलं
Delimitation Politics : केंद्र सरकारने परिसीमन विधेयकाला मंजुरी दिली. लोकसभेच्या जागा ५० टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. राहुल गांधींचा विरोध, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अटींसह पाठिंबा.

Delimitation Politics : संसदेचे विशेष अधिवेशन येत्या ३० नोव्हेंबरपासून सुरू होत असून, त्यात परिसीमन आणि महिला आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी राहणार आहे. केंद्र सरकारने परिसीमनाशी संबंधित विधेयकाला आजच (दि. 27) मंजुरी दिली आहे. लोकसभेतील जागा प्रत्येक राज्यात ५० टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या संसदीय रणनीती समितीच्या बैठकीत विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय स्पष्ट केला. विरोधकांकडे विधेयक रोखण्यासाठी पुरेसे संख्याबळ असो किंवा नसो, काँग्रेस प्रत्येक स्तरावर विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. भाजप स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी हे विधेयक आणत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
कांग्रेस की मांग 👇 https://t.co/lSuyySx5uM
— Congress (@INCIndia) November 27, 2026
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. त्यात लोकसभा आणि राज्यसभेतील पक्षाचे खासदार सहभागी झाले होते. बैठकीनंतर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी परिसीमनाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगितले. या विषयावर पक्ष आपल्या मागण्यांशी तडजोड करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मोदी-शाह यांच्यावर काँग्रेसचा आरोप –
काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, ३० नोव्हेंबरला लोकसभेत चर्चेसाठी येणारी विधेयके २७ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत खासदारांना देण्यात आली नव्हती. विधेयकांचा मजकूर न दाखवता चर्चा घाईने घडवून आणणे चुकीचे असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. महिला आरक्षण सध्याच्या ५४३ लोकसभा जागांमध्येच लागू करावे, अशीही पक्षाची मागणी आहे.
CPP चेयरपर्सन श्रीमती @SoniaGandhi जी, कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge, नेता विपक्ष श्री @RahulGandhi और कांग्रेस दल के वरिष्ठ सांसदों के साथ आगामी संसद सत्र को लेकर एक महत्वपूर्ण बैठक हुई है।
कल इसी मुद्दे पर श्री @kharge के नेतृत्व में दूसरे राजनीतिक दलों के साथ हमारी एक महत्वपूर्ण बैठक होगी।
जानकारी के मुताबिक मोदी सरकार फिर से संसद में परिसीमन बिल लाने की कोशिश कर रही है।
कांग्रेस दल की स्पष्ट मांग है 👇
1. लोकसभा की वर्तमान संख्या को बरकरार रखा जाए
2. लोकसभा की वर्तमान संख्या पर महिला आरक्षण दिया जाए
3. अगले 25 साल तक लोकसभा में राज्यों के बीच सीटों का मौजूदा बंटवारा बरकरार रखा जाए⦿ पहले SIR के द्वारा मोदी-शाह चुनते थे कि कौन वोट देगा और कौन नहीं, लेकिन अब परिसीमन से यह तय करेंगे कि कौन कहां वोट देगा और कहां नहीं?
⦿ मोदी-शाह ने चुनाव आयोग को अपनी कठपुतली बना रखा है, ऐसे में ये परिसीमन से लोगों का क्या भला करेंगे?
⦿ वो दल जो एक ही दिन में 140 से ज्यादा सांसदों का निलंबन करवा देता है और फिर कानून लाकर मुख्य चुनाव आयुक्त को लीगल इम्युनिटी देता है- क्या वो सदन को अच्छे से चलाने की मंशा रखता है?
⦿ BJP की मंशा संविधान बदलने की है, क्योंकि पहले वे अपने मंसूबों में कामयाब नहीं हो सके थे, इसलिए अब परिसीमन के जरिए संख्या बल बढ़ाकर संविधान बदलना चाहते हैं- यही इनका अंतिम लक्ष्य है
लेकिन कांग्रेस पार्टी, अन्य दलों के साथ मिलकर इसके खिलाफ पूरी मजबूती से लड़ेगी।
: लोकसभा में कांग्रेस के उपनेता @GauravGogoiAsm जी
📍 दिल्ली
— Congress (@INCIndia) November 27, 2026
प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागा ५० टक्क्यांनी वाढणार?
केंद्रीय मंत्रिमंडळाने २७ नोव्हेंबरला परिसीमन आणि महिला आरक्षणाशी संबंधित नव्या विधेयकाला मंजुरी दिली. या प्रस्तावानुसार प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागा सध्याच्या संख्येपेक्षा ५० टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकसभेतील एकूण जागा ५४३ वरून सुमारे ८१५ होऊ शकतात.
महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक राज्याच्या जागांमध्ये समान प्रमाणात वाढ करून राज्यांमधील जागांचे सध्याचे प्रमाण २०५१ पर्यंत कायम ठेवण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीच्या वेगवेगळ्या प्रमाणामुळे दक्षिणेकडील राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व कमी होण्याची भीती दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महिलांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचाही या विधेयकाचा उद्देश आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा; विरोधकांत मतभेद –
या विधेयकावर विरोधी पक्षांमध्येही एकमत नसल्याचे चित्र आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा समान ५० टक्क्यांनी वाढवण्याची अट मान्य झाल्यास विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी २७ नोव्हेंबरला ही माहिती दिली.
My interview with Karan Thapar today on my concerns about the #delimitationbill2026 :
https://t.co/5Ecvhq27Vs
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) November 27, 2026
द्रमुकसह काही पक्षांनीही राज्यांचे सध्याचे प्रतिनिधित्व कायम ठेवण्याची मागणी केली आहे. काँग्रेस मात्र विधेयकाच्या सध्याच्या स्वरूपाला विरोध करत आहे. त्यामुळे २८ नोव्हेंबरला होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत पुढील रणनीती ठरण्याची शक्यता आहे.
आता सर्वांचे लक्ष संसदेच्या विशेष अधिवेशनाकडे लागले आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असली, तरी विधेयक मंजूर होण्यासाठी दोन्ही सभागृहांत आवश्यक घटनात्मक बहुमत मिळवावे लागणार आहे. यापूर्वी एप्रिल २०२६ मध्ये यासंबंधीचे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने मंजूर होऊ शकले नव्हते. त्यामुळे यावेळी सरकारला विरोधी पक्षांचा किती पाठिंबा मिळतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
बहुमताचे गणित :
लोकसभेच्या ५४३ मंजूर जागांपैकी सध्या ३ जागा रिक्त असून ५४० सदस्य आहेत. घटनादुरुस्ती विधेयकासाठी सर्व सदस्य मतदानाला उपस्थित राहिल्यास किमान ३६० मते आवश्यक आहेत. सत्ताधारी एनडीएकडे सुमारे ३२० खासदार असून ४० मतांची कमतरता आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी (८), द्रमुक (२२) आणि वायएसआर काँग्रेस (४) यांनी पाठिंबा दिल्यास संख्या ३५४ होईल. तरीही ६ मतांची गरज राहील. मात्र अनुपस्थितीमुळे आवश्यक बहुमत बदलू शकते. त्यामुळे विरोधी खासदारांची भूमिका, पक्षांतर आणि तटस्थ राहणारे खासदार निर्णायक ठरतील.





