Delhi weather : मुसळधार पावसाने राजधानी तुंबली; आप आणि भाजपमध्ये झुंपली…

Delhi weather – शनिवारी रात्री दिल्लीत झालेल्या पावसानंतर दिल्लीतील अनेक भागात पाणी साचले होते, त्यामुळे रविवारी सकाळी दिल्लीची दयनीय अवस्था झाली होती त्यामुळेच दिल्लीत पाणी तुंबण्याच्या विषयावरून आता राजकारण सुरू झाले आहे. राजधानीत जरी हा मान्सूनपूर्व पाऊस असला तरी, यामध्येच दिल्लीतील अनेक भाग पाण्यात बुडालेले दिसल्यामुळे विरोधी पक्षांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीची कोंडी करण्यास सुरूवात केली आहे.
दिवसभर सोशल मीडियावर आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या पोस्ट येत होत्या. यात दिल्लीतील वेगवेगळ्या भागातील फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून पाणी साचण्यासाठी दिल्लीच्या भाजप सरकारला जबाबदार धरण्यात आले. तर दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनीही विरोधकांच्या आरोपांना तेवढेच जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली.
वीरेंद्र सचदेवा म्हणाले आहेत की दरवर्षी दिल्लीत पावसाळ्यात अचानक वादळ आणि पाणी साचण्याच्या घटना घडत असत, परंतु गेल्या वर्षीपर्यंत तत्कालीन सरकारच्या दुर्लक्षामुळे अशा दिवशी दिल्लीची दुर्दशा पाहण्यासारखी होती, परंतु आज तीच परिस्थिती बरीच सुधारली आहे.
सचदेवा म्हणाले आहेत की, रविवारी सकाळी दिल्लीतील लोक जागे झाले तेव्हा काल रात्री उशिरा आलेल्या वादळामुळे दिल्लीत अनेक ठिकाणी झाडे पडणे आणि पाणी साचणे इत्यादी तक्रारी आल्या. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सूचनेनुसार, भाजपचे सर्व आमदार आणि नगरसेवक, जल मंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी रविवार असूनही रस्त्यावर उतरले आणि सकाळी ९ वाजेपर्यंत दिल्लीतील वाहतूक सुरळीत झाली आणि दुपारी १२ वाजेपर्यंत परिस्थिती सामान्य झाली.
दिल्लीतील मागील केजरीवाल सरकारवर निशाणा साधताना सचदेवा म्हणाले की, केजरीवाल सरकार पाणी साचल्याबद्दल उपराज्यपाल आणि अधिकाऱ्यांना दोष देत असे आणि दिल्लीतील लोकांना नशिबाच्या दयेवर सोडत असे, तर सध्याचे भाजप सरकार ही जबाबदारी स्वतःवर घेते आणि अचानक वादळ आणि पावसानंतर परिस्थिती सामान्य करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपली ताकद बनवते.





