Delhi Red Fort Blast : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला येथील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ आज सायंकाळी ६:५५ च्या सुमारास उभ्या असलेल्या एका इको व्हॅनमध्ये झालेल्या हाय इंटेंसिटी स्फोटामुळे (High Intensity Blast) प्रचंड हाहाकार माजला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे, तर २४ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अशातच आता या स्फोटाचा तपास सुरु असताना पोलीसांना सर्वात मोठं यश मिळाले आहे. एक संशयिताला ताब्यात घेण्यात आले असल्याचं समोर आलं आहे. एका संशयिताला ताब्यात घेतले : दिल्ली पोलीसांच्या सुत्रांनी हा हल्ला नियोजित कट असून दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तवला आहे. अशातच आता स्फोटाच्या वेळी कारमध्ये असलेल्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला गंभीर अवस्थेत एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची चौकशी सुरु करण्यात येणार आहे. यातून मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. घटनास्थळावरून स्फोटक साहित्य, वायरिंग आणि बॅटरीचे तुकडे ताब्यात : या हल्ल्यानंतर फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून स्फोटक साहित्य, वायरिंग आणि बॅटरीचे तुकडे ताब्यात घेतले आहेत. घटनास्थळी या वस्तू सापडल्यामुळे हा स्फोट हाताने घडवला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेनंतर आता हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत.