Delhi Protest : दिल्लीतील आंदोलनात राहुल गांधी आणि प्रणिती शिंदेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Delhi Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मंगळवारी (६ ऑक्टोबर २०२६) 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या खासदारांनी नवी दिल्लीत जोरदार निदर्शने केली.

Delhi Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी (6 ऑक्टोबर) दिल्लीत आंदोलन केलं. संसद भवनातून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे निघालेला मोर्चा पोलिसांनी निती आयोगाजवळ अडवला. त्यानंतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. (Delhi Protest)
पोलिसांनी अनेक खासदारांना ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आकाशवाणी भवनाच्या परिसरात जाऊन आंदोलन सुरू ठेवलं. दोघांनी परिसरातील झाडाखाली बसून ठिय्या दिला. काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल, पवन खेरा, दीपेंद्र हुड्डा यांच्यासह खासदार प्रणिती शिंदेही आंदोलनस्थळी उपस्थित होत्या. (Delhi Protest)
दरम्यान, राहुल गांधी यांनी पोलिसांच्या बॅरिकेडवर चढून आंदोलन केलं. त्यानंतर आंदोलनाचा केंद्रबिंदू आकाशवाणी भवन परिसर बनला. पोलिसांकडून आंदोलकांना परिसर रिकामा करण्यास सांगण्यात आलं; मात्र आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवलं. (Delhi Protest)

सुमारे आठ ते नऊ तास आंदोलन सुरू राहिल्यानंतर रात्री दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांना आकाशवाणी भवन परिसरातून हटवून ताब्यात घेतलं. या कारवाईपूर्वीच इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या आंदोलनात महाराष्ट्रातील काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे सहभागी झाल्या होत्या. त्या बॅरिकेडवर चढतानाचे दृश्यही समोर आले आहे. (Delhi Protest)
इंडिया आघाडीने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (SIR) प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारकडून मात्र मतदार याद्यांच्या पुनरावलोकन प्रक्रियेचा उद्देश अपात्र किंवा डुप्लिकेट नोंदी दूर करणे असल्याचे सांगण्यात आले आहे. (Delhi Protest)


