Delhi MCD Election 2022 : दिल्ली महापालिकेतील 250 पैकी 230 जागा जिंकू – सिसोदिया

नवी दिल्ली – दिल्लीत आम्ही प्रत्येक निवडणुकीत विरोधकांचा पूर्ण सफाया करीतच निवडणुका जिंकल्या आहेत. लोकांना केजरीवालांचे काम एकदम पसंत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही आमच्या पक्षाला असेच एकतर्फी यश मिळेल आणि आम्ही दिल्ली महापालिकेच्या 250 पैकी 230 जागा जिंकू, असा विश्वास दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केला आहे.
दिल्लीतून भाजपला पळवून लावून दिल्ली एकदम साफ करण्याचे काम येथील जनता करेल, असा विश्वास त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे.
यावेळी आम्ही महिला उमेदवारांना येथे अधिक संधी देणार आहोत, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. दिल्लीत भाजपने मनोहर कहानीया सुरू केल्या आहेत; पण लोक त्यांच्या या कहाण्यांना भुलणार नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.
High Voltage Drama ! तिकीट नाकारल्याने ‘आप’च्या कार्यकर्त्याचे शोले स्टाईल आंदोलन, पहा व्हिडीओ…
दरम्यान, दिल्लीतील तीन महापालिकांचे एकत्रिकरण करून तीन महापालिकांची एकच महापालिका स्थापन करण्यात आली आहे. या एकत्रित महापालिकेच्या एकूण 250 जागा असून त्यासाठी 4 डिसेंबरला मतदान होणार असून 7 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.





