नवी दिल्ली – आगामी दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आल्याने नाराज झालेले आम आदमी पक्षाचे माजी नगरसेवक हसीब-उल-हसन रविवारी पूर्व दिल्लीतील विजेच्या (Denied ticket, Former AAP councillor Haseeb-ul-Hasan climbs tower) टॉवरवर चढून पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात शोले स्टाईल अनोखे आंदोलन केले.
अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना सकाळी 10.51 वाजता गांधी नगर भागात एक व्यक्ती इलेक्ट्रिक टॉवरवर चढल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दल आणि बीएसईएसच्या अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी हसनला खाली उतरण्याची विनंती केली.
Delhi |Had media not come Durgesh Pathak,Atishi,Sanjay Singh wouldn’t have returned my paper.They sold ticket to Deepu Chaudhary for Rs 3 Cr,demanded money from me but I don’t have any: AAP’s Haseeb-ul-Hasan who climbed transmission tower allegedly for not getting MCD poll ticket pic.twitter.com/P5ienYKqVc
— ANI (@ANI) November 13, 2022
बऱ्याच मिन्नतवारीनंतर त्यांनी खाली उतरण्यास होकार दिला. आपने शनिवारी 117 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात हसीब यांचे नाव नव्हते. त्यामुळे त्यांनी हे आंदोलन करून आपला निषेध नोंदवला.
नाल्यात उतरून केली होती सफाई
दरम्यान, यापूर्वी मार्च 2022 मध्ये हसीब उल हसन यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात ते नाल्यात उतरून सफाई करताना दिसले होते. सफाई न झाल्याने नाला ओव्हरफ्लो झाल्याचे त्यांचे म्हणणे होते.
वारंवार तक्रार करुनही नाल्याची सफाई झाली नव्हती. यानंतर त्यांनी स्वतः तो साफ करण्याचा निर्णय घेतला. यानंतर लोकांनी त्यांना दुधाने अंघोळ घातली होती.