Abhijit Dipke : अनेक जण विकले गेले, पण देशाचा तरुण घाबरलेला नाही : अभिजीत दिपके
Abhijit Dipke : तुरूंगवासाच्या भीतीने अनेक जण विकले गेले. अनेकांनी तडजोड केली. मात्र, या देशाचा विद्यार्थी, तरूण विकला गेलेला नाही. आम्ही घाबरलेलो नाही. आपला लढा प्रदीर्घ आहे

Abhijit Dipke : तुरूंगवासाच्या भीतीने अनेक जण विकले गेले. अनेकांनी तडजोड केली. मात्र, या देशाचा विद्यार्थी, तरूण विकला गेलेला नाही. आम्ही घाबरलेलो नाही. आपला लढा प्रदीर्घ आहे, अशी भूमिका कॉक्राेच जनता पार्टीचा (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके याने मांडली. (Abhijit Dipke)
अमेरिकेहून शनिवारी सकाळी दिपके याचे देशाची राजधानी दिल्लीत आगमन झाले. दिल्ली पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी दिल्याने तो जंतर-मंतर परिसरात दाखल झाला. त्या आंदोलनस्थळी आधीपासूनच मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते. (Abhijit Dipke)
त्यांच्या समोर भाषण करताना दिपके याने न घाबरण्याचा संदेश दिला. मी अमेरिकेला जाण्यासाठी निघालो तेव्हा माझी आई जेवढी रडली नाही; तेवढी मायदेशी परतत असताना रडली. माझ्या आईला माझ्या अटकेची भीती वाटत होती. तशी भीती केवळ माझ्या आईला वाटत नाही. (Abhijit Dipke)
तर, राजकारणावर बोलणाऱ्या प्रत्येक तरूणाच्या पालकांना वाटते. आपण किती काळ भीतीच्या छायेत जगणार, असा सवाल त्याने उपस्थितांना केला. मित्रांनो, आपला लढा प्रदीर्घ काळ चालणारा आहे. सोशल मीडियावरून आपण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. (Abhijit Dipke)
त्या मागणीला आता महिनाभराचा कालावधी होत आला आहे. मात्र, मागणीला प्रतिसाद देण्याऐवजी इतर बाबींवर फोकस करण्याचे सत्र सुरू आहे. आमचे सोशल मीडिया अकाऊंटस् हॅक करणे, पोस्टस् डिलिट करणे आदी प्रकार सुरू आहेत. (Abhijit Dipke)





