Delhi Athletes Stipend : खेळाडूंसाठी खुशखबर! दरमहा बँक खात्यात जमा होणार २ हजार रुपये; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
Delhi Athletes Stipend : मुख्यमंत्री क्रीडा प्रोत्साहन योजनेअंतर्गत, तळागाळातील युवा खेळाडूंना दरमहा ₹2,000 ची आर्थिक मदत मिळेल. याचा लाभ कोणाला होणार आहे ते जाणून घ्या.

Delhi Government Monthly Stipend 2000 Rupees Young Athletes Grassroots Training Scheme : तळागाळातील उदयोन्मुख क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आर्थिक अडचणींमुळे खेळाडूंचे प्रशिक्षण थांबू नये, यासाठी दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत युवा खेळाडूंना दरमहा २,००० रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. ‘मुख्यमंत्री खेळ प्रोत्साहन योजने’अंतर्गत ‘ग्रासरूट ट्रेनिंग सपोर्ट असिस्टन्स’च्या माध्यमातून ही आर्थिक मदत थेट दिल्ली सरकारच्या क्रीडा संकुलांमध्ये नियमित सराव करणाऱ्या खेळाडूंना दिली जाणार आहे.
आर्थिक विवंचनेतून सराव सुटू नये; डाएट आणि प्रवासाचा भार हलका होणार –
सुरुवातीच्या टप्प्यात खेळाडूंना सकस आहार, स्थानिक प्रवास, क्रीडा साहित्य आणि वैद्यकीय उपचारांवर सातत्याने मोठा खर्च करावा लागतो. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केले की, अनेक होतकरू खेळाडू केवळ आर्थिक चणचणीमुळे खेळापासून दूर जातात. दरमहा मिळणाऱ्या या २ हजार रुपयांच्या मदतीमुळे खेळाडूंना विनाअडथळा प्रशिक्षण सुरू ठेवता येईल आणि खेळाडू गळतीचे प्रमाण कमी होऊन त्यांची गुणवत्ता टिकून राहील.
२५ टक्के खेळाडू पात्र; अंडर-१४ ते अंडर-२१ वयोगटाला लाभ!
Delhi Government approves ‘Grassroot Training Support Assistance’ under the Mukhyamantri Khel Protsahan Yojana.
Eligible athletes training at Delhi government sports centres and stadiums will receive ₹2,000 per month. The scheme covers Under-14, Under-17, Under-19 and Under-21… pic.twitter.com/zrcVUTsLIK
— All India Radio News (@airnewsalerts) September 11, 2026
या नवीन धोरणानुसार सरकारी क्रीडा संकुल किंवा स्टेडियममध्ये नियमित सराव करणाऱ्यांपैकी जास्तीत जास्त २५ टक्के खेळाडूंना ही मदत मिळेल. सर्वसाधारणपणे एका केंद्रातून कमाल १०० खेळाडू निवडले जातील, तर मोठ्या स्टेडियममध्ये ही संख्या १५० पर्यंत असू शकते. अंडर-१४, अंडर-१७, अंडर-१९ आणि अंडर-२१ वयोगटातील खेळाडू यासाठी पात्र ठरतील. खेळाडूंचे क्रीडा कौशल्य, क्षमता, नियमित उपस्थिती, शिस्त आणि आर्थिक स्थिती तपासूनच अंतिम निवड केली जाईल.
८० टक्के उपस्थिती अनिवार्य; उत्कृष्ट खेळाडूंना वर्षाला २० लाखांपर्यंत मदत –
For every young athlete who shows up before sunrise, trains harder and dreams bigger, Delhi is stepping in with support.
Inspired by Hon’ble Prime Minister Shri @narendramodi’s vision of empowering sporting talent, Delhi Government, under guidance of Chief Minister Smt. Rekha… pic.twitter.com/FQuxlS7Ui4
— CMO Delhi (@CMODelhi) September 11, 2026
योजनेचा लाभ घेण्यासाठी नियमित नोंदणीसोबतच किमान ८० टक्के उपस्थिती अनिवार्य असून दर तीन महिन्यांनी खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. याशिवाय दिल्ली सरकारकडून आधीपासूनच दर्जेदार शालेय खेळाडूंना कोचिंग व उपकरणांसाठी वार्षिक ५ लाखांपर्यंत, आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या खर्चासाठी २ लाख रुपयांपर्यंत, तर उच्च पातळीवर प्रतिनिधित्व करणाऱ्या अव्वल खेळाडूंना वार्षिक २० लाख रुपयांपर्यंतची भरीव मदत दिली जात आहे.





