Delhi Fire : दिल्लीतील भीषण आगीत नऊ महिन्यांच्या चिमुरडीसह ४ जणांचा होरपळून मृत्यू, २ जण गंभीर जखमी
Updated On:

Delhi Fire : दिल्लीतील शाहदरा भागात शुक्रवारी एका इमारतीला लागलेल्या आगीत ९ महिन्यांच्या चिमुरडीसह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर-पूर्व दिल्लीतील शाहदरा एका घरात भीषण आग लागली. ही माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली.
त्यानंतर घटनास्थळी ५ गाड्या रवाना झाल्या होत्या. त्यानंतर आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र या आगीत आतापर्यंत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.
आगीत सोनी, रचना आणि गौरी सोनी आणि नऊ महिन्यांची रुही अशी मृतांची नावे आहेत. तर राधिका आणि प्रभावती अशी गंभीर जखमींची नावे आहेत. दरम्यान, आग कशामुळे लागली याचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.




