Delhi Elections 2025 : दिल्लीत दुपारपर्यंत एकूण किती मतदान झाले? ‘या’ भागात झाले सर्वाधिक मतदान….

Delhi Assembly Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज (5 फेब्रुवारी) सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष (आप), काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात थेट सामना होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दिल्लीतील सर्व 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. जवळपास 699 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेठीत बंद होईल. दुपारी 2 वाजेपर्यंत एकूण 33.31 टक्के मतदान झाले असल्याचं समोर आलं आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु झालं असून दुपारी 2 वाजेपर्यंत एकूण 33.31 टक्के मतदान झाले. ईशान्य दिल्लीत सर्वाधिक 39.81 टक्के मतदान झाले.
मध्य दिल्लीत सर्वात कमी 29.74 टक्के मतदान झाले. मुस्तफाबाद मतदारसंघात सर्वाधिक 43 टक्के मतदान झाले. सर्वात कमी 25.01 टक्के मतदान करोलबागमध्ये झाले.
कोणत्या भागात किती मतदान झाले पाहा :
मध्य दिल्ली: 29.74
पूर्व दिल्ली: 33.66
नवी दिल्ली : 29.89
उत्तर दिल्ली: 32.44
ईशान्य दिल्ली: 39.51
उत्तर पश्चिम दिल्ली: 33.17
शाहदरा: 35.81
दक्षिण दिल्ली: 32.67
दक्षिण पूर्व दिल्ली: 32.27
दक्षिण पश्चिम दिल्ली: 35.44
पश्चिम दिल्ली: 30.87





