Electoral Map of India 2025: जवळपास 27 वर्षानंतर भाजप दिल्लीमध्ये सत्तेत परतत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने 70 पैकी 48 जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टीने (AAP) फक्त 22 जागा जिंकल्या आहेत. दिल्लीतील विजयासह भाजप किंवा त्यांच्या सहकारी पक्षांचे जवळपास 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सरकार स्थापन झाले आहे.
2024 मध्ये आठ विधानसभा निवडणूका पार पडल्या. यापैकी भाजपने एकट्याने अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि हरियाणामध्ये बहुमत मिळवले आहे. तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि सिक्कीममध्ये यूतीचे सरकार आहे. पक्षाला केवळ झारखंड आणि जम्मू –काश्मीरमध्ये विजय मिळवण्यात अपयश आले.
या राज्य-केंद्रशासित प्रदेशात भाजप-एनडीएचे सरकार
सध्या देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, बिहार, ओडिशा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, आंध्र प्रदेश, आसम, अरुणाचल प्रदेश, मणिपुर, त्रिपुरा, मेघालय, सिक्किम, नागालँड आणि पुडुचेरी या 21 राज्य-केंद्रशासित प्रदेशांमध्ये भाजप-एनडीएचे सरकार आहे.
2026 मध्ये 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होतील. यामध्ये पश्चिम बंगाल, असम, पुडुचेरी, तमिलनाडु आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहेत. 2020 मध्ये ‘आप’ला 70 पैकी 62 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, यावेळी त्यांचे केवळ 22 उमेदवार निवडून आले आहेत. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सौरव भारद्वाज यांसारखे दिग्गज नेते देखील या निवडणुकीत पराभूत झाले.