आता महिलांना मिळणार दरमहा २५०० रुपये ; काँग्रेसकडून ‘प्यारी दीदी योजना’ जाहीर

Delhi Congress Pyari Didi Yojana । दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसने महिलांसाठी ‘प्यारी दीदी योजना’ जाहीर केली आहे. त्याअंतर्गत महिलांना दरमहा २५०० रुपये दिले जाणार आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर सत्तेत आल्यानंतर ही रक्कम महिलांना दिली जाईल, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.
महिलांना दरमहा २५०० रुपये मिळणार Delhi Congress Pyari Didi Yojana ।
काँग्रेसकडून आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यामध्ये दिल्लीतील महिलांसाठी ‘प्यारी दीदी योजने’ची जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत दिल्लीतील महिलांना दरमहा २५०० रुपये मिळणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
After the successful launch of the guarantee programme in Karnataka, we are launching the “Pyari Didi” scheme in Delhi.
I am confident that the Congress government will be elected in Delhi, and we will implement the scheme of Rs 2500 to every woman on the first day.
As per the… pic.twitter.com/IqjpXarjhT
— Congress (@INCIndia) January 6, 2025
कर्नाटकच्या धर्तीवर दिल्लीत योजना जाहीर Delhi Congress Pyari Didi Yojana ।
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि KPCC अध्यक्ष श्री DK शिवकुमार यांनी याविषयी माहिती दिली. याविषयी बोलताना, “कर्नाटकमध्ये हमी कार्यक्रमाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आम्ही दिल्लीत “प्यारी दीदी” योजना सुरू करत आहोत. मला पूर्ण विश्वास आहे की दिल्लीत काँग्रेसचे सरकार येईल आणि पहिल्या दिवशी प्रत्येक महिलेला २५०० रुपये देण्याची योजना आम्ही राबवू. कर्नाटक मॉडेलनुसार दिल्लीतही हमीभाव लागू केला जाईल.” असे म्हणत त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला.





