CJP Protest : CJP च्या आंदोलनाला धक्कादायक वळण; अभिजीत दिपकेंना पोलिसांनी उचललं, आंदोलकांवरही लाठीमार
Abhijit Dipke : पेपरफुटी व गैरव्यवहारांच्या निषेधार्थ पुकारलेल्या आंदोलनाला आज राजधानी दिल्लीत अत्यंत हिंसक आणि नाट्यमय वळण मिळाले.

CJP Protest : नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांतील कथित गैरव्यवहारांच्या निषेधार्थ सुरू असलेल्या Cockroach Janta Party (CJP) च्या आंदोलनाला सोमवारी नाट्यमय वळण मिळाले. जंतर-मंतरवरून संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. या कारवाईदरम्यान CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (CJP Protest)
जंतर-मंतरवर बॅरिकेडिंग, संसदेकडे मोर्चा रोखला
संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग केले होते. पोलिसांच्या बंदोबस्ताला न जुमानता अनेक आंदोलकांनी संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे वृत्त आहे, मात्र पोलिसांनी अत्यधिक बळाचा वापर केल्याचे आरोप फेटाळले आहेत. (CJP Protest)
सरकारशी चर्चेचे प्रयत्न
कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन आणि पोलिसांचा लाठीमार सुरु असताना दुसर्या बाजूला सरकारने आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्नही केला. कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांना जे.पी. नड्डा यांनी चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, जे.पी. नड्डा यांनी आम्हाला दोन तास वाट पाहायला लावली आणि त्यानंतर फक्त 10 मिनिटांची भेट दिली, असे कॉकरोच पार्टीकडून सांगण्यात आले. (CJP Protest)
हजारो आंदोलकांची उपस्थिती
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, दिल्लीत हजारो विद्यार्थी आणि युवक आंदोलनात सहभागी झाले होते. विविध वृत्तांमध्ये आंदोलकांच्या संख्येबाबत वेगवेगळे दावे करण्यात आले असले तरी 75 हजार आंदोलक जमल्याच्या दाव्याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. (CJP Protest)
आंदोलनाची प्रमुख मागणी
CJP आणि आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांवर कठोर कारवाई आणि शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची आहे. (CJP Protest)






