Delhi Capitals Record : जेमिमा रॉड्रिग्जच्या विक्रमी अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने फायनलमध्ये रचला इतिहास! आरसीबीला फोडला घाम
Delhi Capitals record : डब्ल्यूपीएलच्या इतिहासात फायनलमध्ये २०० पेक्षा अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिल्लीने आरसीबीसमोर २०४ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.

Delhi Capitals record total in WPL 2026 Final : महिला प्रीमियर लीग २०२६ (WPL) च्या जेतेपदासाठी आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात हायव्होल्टेज रणसंग्राम सुरू आहे. कर्णधार जेमिमा रॉड्रिग्स आणि लॉरा वॉल्व्हार्ड यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २०३ धावांचा डोंगर उभा केला आहे. डब्ल्यूपीएलच्या इतिहासात फायनलमध्ये २०० पेक्षा अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मुंबई इंडियन्सचा मोडला विक्रम –
याआधी डब्ल्यूपीएल फायनलमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावे होता. गेल्या हंगामात मुंबईने १४९ धावा केल्या होत्या. मात्र, आज दिल्लीच्या फलंदाजांनी आरसीबीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत २०३ धावा कुटल्या. आता आरसीबीला पहिले जेतेपद पटकावण्यासाठी २०४ धावांचे विक्रमी लक्ष्य गाठावे लागणार आहे.
Fiery final flourish! 💪
🎥 Chinelle Henry at her very best to power @DelhiCapitals to 2⃣0⃣3⃣/4 👏
Scorecard ▶️ https://t.co/9sgUo0XSZa#TATAWPL | #ClaimTheCrown | #RCBvDC | #Final pic.twitter.com/IBNEaimlGh
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 5, 2026
जेमिमा रॉड्रिग्सने साकारले विक्रमी अर्धशतक –
डब्ल्यूपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जने केले सर्वात जलद अर्धशतक
आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. लिझेल ली (३७) आणि शेफाली वर्मा (२०) यांनी ४९ धावांची सलामी दिली. यानंतर जेमिमा रॉड्रिग्सने मैदानाचा ताबा घेतला. जेमिमा रॉड्रिग्जने फक्त ३२ चेंडूत अर्धशतक झळकावले. महिला प्रीमियर लीगमधील कोणत्याही खेळाडूने केलेले हे सर्वात जलद अर्धशतक आहे. नॅट सायव्हर ब्रंटने गुजरात जायंट्सविरुद्ध फक्त २९ चेंडूत अर्धशतक झळकावले, परंतु तिने ही खेळी एलिमिनेटरमध्ये खेळली. अंतिम सामन्यात रॉड्रिग्जची स्फोटक खेळी साकारली. तिने अवघ्या ३७ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ५७ धावांची शानदार खेळी साकारली.
अखेरच्या षटकांत शिनेल हेन्रीचा ‘रुद्र’ अवतार –
We’ll let you do the math! 🔢😌
Chinelle Henry’s power was on full display in that massive 19th over 🔥
Updates ▶️ https://t.co/9sgUo0YqOI#TATAWPL | #ClaimTheCrown | #RCBvDC | #Final | @DelhiCapitals pic.twitter.com/MWZtB2lobq
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 5, 2026
जेमिमा बाद झाल्यानंतर लॉरा वॉल्व्हार्डने ४४ धावांचे (२५ चेंडू) योगदान दिले. मात्र, डावाचा खरा शेवट शिनेल हेन्रीने केला. हेन्रीने अवघ्या १५ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर २३३ च्या स्ट्राईक रेटने ३५ धावा चोपल्या. तिच्या या फटकेबाजीमुळे दिल्लीने २०० चा टप्पा ओलांडला. आरसीबीकडून सोफी मोलिनक्स आणि आशा शोभना यांनी विकेट्स घेतल्या, मात्र दिल्लीच्या धावगतीला त्या लगाम लावू शकल्या नाहीत.





