Tilak Varma Angry : ‘चल, बंद कर कॅमेरा!’ अर्शदीपच्या कृतीवर तिलक भडकला? ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं? पाहा VIDEO
Tilak Varma Angry : नुकताच अर्शदीपने ड्रेसिंग रूममधील एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिलक वर्मा त्याच्यावर चांगलाच 'नाराज' झालेला दिसत आहे.

Tilak Varma Angry on Arshdeep Singh : मैदानावर आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांच्या दांड्या उडवणारा अर्शदीप सिंग मैदानाबाहेर त्याच्या मिश्किल स्वभावासाठी ओळखला जातो. सोशल मीडियावर सहकाऱ्यांची खेचण्याची एकही संधी अर्शदीप सोडत नाही. नुकताच अर्शदीपने ड्रेसिंग रूममधील एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिलक वर्मा त्याच्यावर चांगलाच ‘नाराज’ झालेला दिसत आहे.
अर्शदीपची मस्ती अन् तिलकला ‘राग’ अनावर –
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० वर्ल्ड कप सराव सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये रिलॅक्स मूडमध्ये होते. यादरम्यान, तिलक वर्मा शांतपणे जेवण करत असताना अर्शदीपने गुपचूप त्याचा व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. अचानक कॅमेरा समोर पाहून तिलक काहीसा अस्वस्थ झाला आणि त्याने तातडीने रेकॉर्डिंग थांबवण्यास सांगितले. सुरुवातीला तिलक रागावल्यासारखा वाटला असला तरी, व्हिडीओच्या शेवटी हा सर्व प्रकार केवळ ‘मजाक’ असल्याचे लक्षात येते. या दोघांमध्ये घट्ट मैत्री असून ते एकमेकांसोबत नेहमीच अशा खोड्या काढत असतात.
दुखापतीनंतर तिलक वर्माचा ‘रुद्र’ अवतार –
After the warm-up match against South Africa, Arshdeep Singh, Ishan Kishan, and Tilak Varma were having fun in the dressing room. 😄
Without informing Tilak, Arshdeep Singh suddenly started making a reel by covering Tilak, which annoyed Tilak and made him angry. 🤬🥵 pic.twitter.com/BBGefO7rtu
— Jara (@JARA_Memer) February 4, 2026
केवळ मस्करीच नाही, तर मैदानावरील कामगिरीनेही तिलकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. एका गंभीर शस्त्रक्रियेनंतर संघात परतलेल्या तिलकने दक्षिण आफ्रिकेच्या घातक माऱ्यासमोर केवळ १९ चेंडूंत ४५ धावांची आक्रमक खेळी केली. आपल्या खेळीत तिलकने ३ चौकार आणि ३ खणखणीत षटकार ठोकले. शस्त्रक्रियेनंतरही त्याची फलंदाजीतील लय कायम असल्याचे पाहून निवड समितीने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
टीम इंडियाचा ‘हुकमी एक्का’ –
अर्शदीप सिंगवर तिलक वर्मा संतापला
तिलक वर्मा सध्या भारताच्या मधल्या फळीतील सर्वात महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. नुकत्याच झालेल्या आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकवून देण्यात त्याची भूमिका मोलाची होती. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने आपल्या खेळण्याची शैली बदलली असून, भारत यंदा जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.





