Delhi Capitals Qualified : मुंबई इंडियन्सचा खेळ खल्लास! दिल्लीच्या विजयाने हरमनप्रीतच्या संघाला बसला धक्का; एलिमिनेटरचं चित्र स्पष्ट
Delhi Capitals Qualified : या विजयासह दिल्लीने 'एलिमिनेटर'मध्ये आपले स्थान निश्चित केले असून, या निकालामुळे मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आले.

Delhi Capitals Qualified Mumbai Indians out of WPL 2026 : महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ च्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने युपी वॉरियर्सवर ५ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह दिल्लीने ‘एलिमिनेटर’मध्ये आपले स्थान निश्चित केले असून, या निकालामुळे गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे यंदाच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
दिल्लीचा सहज विजय, युपीचे आव्हान संपुष्टात-
१ फेब्रुवारी रोजी झालेल्या या महत्त्वाच्या सामन्यात युपी वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १२२ धावा केल्या होत्या. १२३ धावांचे हे माफक आव्हान दिल्ली कॅपिटल्सने १८.४ षटकांत ५ गडी गमावून पूर्ण केले. या विजयामुळे दिल्लीचे १० गुण झाले असून त्यांनी गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, युपी वॉरियर्स टीम ८ सामन्यांत केवळ २ विजय मिळवू शकल्याने ४ गुणांसह गुणतालिकेत सर्वात तळाला राहिली आहे.
4⃣ seasons 🤝 4⃣ playoffs
A victory by 5⃣ wickets as Captain Jemimah Rodrigues takes @DelhiCapitals over the line in fine fashion 🥳👏
Scorecard ▶️ https://t.co/KvgnknMN0z #TATAWPL | #KhelEmotionKa | #DCvUPW pic.twitter.com/e2Gy8ymEJl
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 1, 2026
गतविजेत्या मुंबई इंडियन्सला बसला मोठा धक्का –
मुंबई इंडियन्सचे चाहते या सामन्यात युपी वॉरियर्सच्या विजयासाठी प्रार्थना करत होते, कारण तसे झाले असते तर नेट रनरेटच्या जोरावर मुंबई प्लेऑफमध्ये पोहोचली असती. मात्र, दिल्लीने विजय मिळवल्यामुळे मुंबईचे ८ सामन्यांत ६ गुणांसह चौथे स्थान राहिले आणि त्यांचे स्पर्धेतील अस्तित्व संपले. २०२३ आणि २०२५ मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईसाठी हा हंगाम निराशाजनक ठरला.
एलिमिनेटर आणि फायनलचे वेळापत्रक –
साखळी फेरी संपल्यानंतर आता प्लेऑफचे चित्र स्पष्ट झाले आहे:
एलिमिनेटर (३ फेब्रुवारी): वडोदरा येथील कोटांबी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात एलिमिनेटर सामना रंगणार आहे.
फायनल (५ फेब्रुवारी): स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ आधीच अंतिम फेरीत पोहोचला आहे. एलिमिनेटर जिंकणारा संघ ५ फेब्रुवारीला आरसीबीशी भिडणार आहे.
डब्ल्यूपीएलचा इतिहास: कोण ठरणार नवा चॅम्पियन?
डब्ल्यूपीएलच्या आतापर्यंतच्या प्रवासात मुंबई इंडियन्स (२०२३, २०२५) आणि आरसीबी (२०२४) यांनी विजेतेपद मिळवले आहे. यंदा आरसीबी आपले विजेतेपद राखणार की गुजरात किंवा दिल्ली यांपैकी एखादा नवा विजेता मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





