IPL 2025 Faf du Plessis : दिल्ली कॅपिटल्सने फाफ डू प्लेसिसच्या खांद्यावर सोपवली मोठी जबाबदारी, संघासाठी ‘ही’ भूमिका निभावणार

Faf du Plessis Delhi Capitals vice captain for IPL 2025 : १७ वर्षांपासून जेतेपद जिंकण्याचे स्वप्न पाहत असलेला दिल्ली कॅपिटल्स संघ या हंगामात अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. ही लीग सुरू होण्यापूर्वी संघाने अनुभवी फलंदाज फाफ डु प्लेसिसवर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्याला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. गेल्या वर्षी झालेल्या मेगा ऑक्शनपूर्वी दिल्लीने रिटेंशन लिस्ट देताना संघात मोठा बदल केला होता, ज्यामध्ये कर्णधार ऋषभ पंतला रिलीज केले होते. त्याचबरोबर कोचिंग स्टाफमध्येही बदल केले होते.
फाफ डू प्लेसिसची कामगिरी कशी राहिलीय?
फाफ डू प्लेसिस आता ४० वर्षांचा झाला असेल, पण तो एसए टी-२० लीगमध्ये यंदा जोबर्ग सुपर किंग्जसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, जिथे त्याने १० डावांमध्ये २८६ धावा केल्या. त्याच्या नेतृत्वाखाली, त्याने सेंट लुसिया किंग्जला कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) जेतेपद मिळवून दिले आहे. त्याच्या फिटनेस आणि धावा काढण्याच्या बाबतीत, तो दोन्ही बाबतीत उत्कृष्ट राहिला आहे. इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक या हंगामासाठी उपलब्ध नसल्याने, त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूसह कॅपिटल्स चांगल्या स्थितीत दिसत आहे.
फाफ डू प्लेसिसला आयपीएलचाही खूप अनुभव –
🚨 FAF DU PLESSIS – VICE CAPTAIN OF DELHI CAPITALS IN IPL 2025. 🚨 pic.twitter.com/WsfflClLXL
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 17, 2025
फाफ डू प्लेसिसला आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे, जिथे त्याने तीन हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) चे नेतृत्व केले आहे. आयपीएल २०२२ च्या आधी झालेल्या मेगा लिलावात तो आरसीबी संघात सामील झाला होता आणि सलग तीन हंगामात नेतृत्व केले.
आयपीएल २०२५ च्या आधी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये डू प्लेसिससाठी बोली लावणारा दिल्ली कॅपिटल्स हा एकमेव संघ होता. दिल्ली कॅपिटल्सने प्लेसिसला त्याच्या २ कोटी रुपयांच्या बेस प्राइसवर फ्रँचायझीमध्ये सामील केले. डू प्लेसिस हा दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार राहिला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार अक्षर पटेलला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे.





