Delhi Cabinet reshuffle : आतिशी मार्लेना यांच्याकडे 12 खात्यांचा कारभार
Updated On:

नवी दिल्ली :- दिल्ली सरकार मधील मंत्री अतिशी यांच्याकडे महसूल, नियोजन आणि वित्त खात्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. हे तीन विभाग पूर्वी मंत्री कैलाश गहलोत यांच्याकडे होते.
या तीन नव्या खात्यांमुळे आतिशी यांच्याकडे आता एकूण 12 खाती झाली आहेत. त्या केजरीवाल मंत्री मंडळातील एकमेव महिला मंत्री आहेत.
गुरुवारी मंत्रिमंडळ फेरबदलाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. खात्यांच्या फेरबदलांच्या संबंधात राज्यपालांकडे चार दिवसांपासून फाइल पाठवूनही ती फाइल मंजूर करण्यात आली नसल्याची तक्रार आम आदमी पक्षाने केली होती. पण नंतर राज्यपालांनी ही फाइल मंजूर केल्यानंतर हा फेरबदल झाला.
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या अटकेनंतर आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर सौरभ भारद्वाज यांच्यासह आतिशी यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता.





