दिल्ली निवडणूकांपूर्वी मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

Delhi Assembly Elections | दिल्लीमध्ये उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्री आतिशी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आतिशी यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल आतिशी आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आतिशी त्यांच्या समर्थकांसह कालकाजी मतदारसंघात पोहोचल्या, तेव्हा आतिशी यांच्यासोबत असलेल्या दोन समर्थकांपैकी एक असलेल्या सागरने व्हिडिओ बनवणाऱ्या पोलिसाकडे हात वर केला, ज्यामुळे मोबाईल खाली पडला. व्हिडिओमध्ये आतिशी मार्लेना यांचा समर्थक सागर मेहता एका पोलिसाला मारताना दिसत आहे. ज्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आतिशी आणि त्यांच्या समर्थकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, त्या व्हिडिओमध्ये एक पोलिस कर्मचारी व्हिडिओ बनवत असल्याचे दिसून येते.
चुनाव आयोग भी ग़ज़ब है!
रमेश बिधूड़ी जी के परिवार के सदस्य खुले-आम आचार संहिता का उल्लंघन कर रहे हैं। उन पर कोई एक्शन नहीं।
मैंने शिकायत कर के पुलिस और @ECISVEEP को बुलाया, और इन्होंने मेरे ऊपर केस दर्ज कर दिया!
राजीव कुमार जी: आप चुनावी प्रक्रिया कि कितनी धज्जियां उड़ायेंगे https://t.co/UlRiBzbELV
— Atishi (@AtishiAAP) February 4, 2025
;
पोलिसांचा आरोप काय ?
पोलिसांचा आरोप आहे की, निवडणूक आचारसंहिता लागू होती आणि निवडणूक प्रचार संपला होता. पण असे असूनही, आतिशी त्यांच्या ४०-५० समर्थकांसह कालकाजी परिसरात फिरत होत्या. त्या कालकाजी परिसरातील कार्यकारी दंडाधिकारी यांच्याशी वाद घालत होत्या, जे फ्लाइंग स्क्वॉडचे प्रभारी देखील आहेत. आतिशी यांच्याबरोबर त्यावेळी १० वाहने होती आणि अनेक समर्थकही तिथे होते.
याप्रकरणी आप नेत्या व दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन दिल्ली पोलीस व निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. आतिशी यांनी लिहिले आहे की, ‘निवडणूक आयोगही अजब आहे. रमेश बिधुरीजींच्या कुटुंबातील सदस्य उघडपणे आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मी पोलिसांकडे तक्रार केली आणि त्यांनी माझ्याविरुद्ध खटला दाखल केला. राजीव कुमारजी, तुम्ही निवडणूक प्रक्रिया किती खराब कराल?’असा सवाल आतिशी मार्लेना यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा:
खासदार सुनेत्रा पवार यांना पहिल्याच टर्ममध्ये राज्यसभेत मिळाली ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी





