“दिल्ली स्फोट मोदी सरकारचे अपयश, जनाची नाही तर मनाची लाज ठेवा”; नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर निशाणा

Nana Patole on Delhi Bomb Blast | सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका चालत्या कारमध्ये अचानक मोठा स्फोट झाल्याने दिल्ली हादरली. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. यातील मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे.
आतापर्यंत यात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या भ्याड हल्ल्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. यावर आता कॉँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
“पुलवामा, पहेलगाम हल्ल्यावेळी आम्ही सरकारच्या सोबत होतो. पहेलगाम, पुलवामाच्या घटनेनंतर राजकारण केलं नाही. ऑपरेशन शिंदूरच्या नावावर शत्रू भारताकडे बघणार नाही, ही जी भूमिका मांडली होती. त्याच आता काय झालं, हे केंद्राच अपयश आहे आणि त्याची जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारावी. केंद्र सरकारने दाखवलेलं स्वप्न भंग झाले. त्यामुळे आता त्यांनी जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी,” अशी टीका नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर केली.
View this post on Instagram
यावेळी नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही हल्लाबोल केला. “हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि केंद्र सरकारचं हे फेल्यूअर आहे. केंद्र सरकारने याची जबाबदारी स्वीकारावी. त्यांनी या घटनेची तुलना मुंबईवरील हल्ल्याशी करत, त्यावेळी भाजपने केलेल्या राजकारणाची आठवण करून दिली.”
देश हित आणि सुरक्षेबद्दल भाजपचा कुठलाही प्लॅन नाही
“निवडणुका लढणे आणि पक्ष जिंकवणे अशा पद्धतीची भूमिका भाजपची असते. देश हित आणि सुरक्षेबद्दल त्यांच्याजवळ कुठलाही प्लॅन नाही. गृहमंत्री बिहारमध्ये विना कॅमेरा एका हॉटेलमध्ये थांबले आहे, कुठलीही सुरक्षा न घेता विना कॅमेरा सीसीटीव्ही फुटेज बंद करून ते काय करत आहेत? कोणत्या लोकांना भेटतात? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहे,” असे म्हणत पटोले यांनी केंद्र सरकारवर लक्ष केले.
मोदींनी दिलेल्या खोटे आश्वासनाची पोलखोल झाली
“आम्हीच करू शकतो अशा पद्धतीने आश्वासन देऊन लोकांना मूर्ख बनवले, आता कश्मीर असुरक्षित आहे. 56 इंचाची छाती आता कुठे गेली? आम्हाला यात राजकारण करायचं नाही. पण दिल्लीत आणि केंद्रात यांचे सरकार असताना हे आतंकवादी या ठिकाणी आले कुठून? असा प्रश्न निर्माण होत आहे. नरेंद्र मोदींनी दिलेल्या खोटे आश्वासनाची पोलखोल आता झाली आहे. हा भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो,” असे नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा:
गाडीतून उतरले अन् पुढे जाताच… जितेंद्र यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल





