‘दिल्लीत भाजप प्रचंड बहुमताचे सरकार स्थापन करेल…’ ; राज्यातील ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

Delhi Assembly Election 2025 । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ५ फेब्रुवारी रोजी सर्व ७० विधानसभा जागांवर एकाच टप्प्यात मतदान होईल आणि ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होतील. यासोबतच राजकीय पक्षांनी विजयासाठी तयारी तीव्र केली आहे. दरम्यान, राज्यातील भाजपचे नेते राम कदम यांनी,”दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल.” असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात घुसखोराला स्थान नाही Delhi Assembly Election 2025 ।
महाराष्ट्रातील रोहिंग्यांच्या बेकायदेशीर घुसखोरी मुद्द्यावर राम कदम म्हणाले, “महाराष्ट्रात घुसखोराला स्थान नाही, मग तो बांगलादेशी घुसखोर असो किंवा इतर कोणताही घुसखोर. महाराष्ट्राची भूमी भारतमातेच्या लोकांची आहे, कोणत्याही घुसखोरांना राज्यात प्रवेश नाही. आम्ही सर्व घुसखोरांना निवडून निवडून महाराष्ट्राबाहेर पाठवू, महाराष्ट्र एटीएस बांगलादेशी नागरिकांवर सतत कारवाई करत आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.
या कारवाईत आतापर्यंत ६० बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे बनावट कागदपत्रे असल्याचे आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून आयबी आणि महाराष्ट्र एटीएसचे पथक गेल्या सोमवारी कोकणातील रत्नागिरी येथे पोहोचले. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत २० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आल्याने केंद्रीय तपास संस्था आयबी सतर्क आहे.
तिरुपती येथील अपघाताबद्दल राम कदम काय म्हणाले? Delhi Assembly Election 2025 ।
याशिवाय तिरुपती घटनेवर ते म्हणाले की, ‘तिरुपती घटनेने मन दु:खी आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी तिरुपती प्रशासनाला काम करावे लागेल” असेही त्यांनी म्हटले. आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला होता. या चेंगराचेंगरीत डझनभर भाविक जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिरुपती बालाजी मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शनासाठी टोकन मिळविण्यासाठी बुधवारी संध्याकाळपासून लोक रांगेत उभे होते.
हेही वाचा
“…तर इंडिया अलायन्स बंद करा” ; ममता, अखिलेश यादवनंतर ‘या’ नेत्याची संतप्त प्रतिक्रिया





