दिल्लीत ‘आप’चा स्वबळाचा नारा ; अरविंद केजरीवालांचा काँग्रेसला मोठा धक्का, युतीच्या चर्चांवर दिला पूर्णविराम

Delhi Assembly Election । दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीची चर्चा मागच्या काही दिवसांपासून होती. आता या सर्व चर्चाना खुद्द आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पूर्णविराम लावला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, “आम आदमी पक्षाने या वृत्तांचे खंडन केले आहे. दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये युती होणार नाही, असे आपने म्हटले आहे.
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार,”दिल्लीत आप स्वबळावर निवडणूक लढवणार. काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारची युती होण्याची शक्यता नाही.”असे त्यांनी म्हटले आहे.
Aam aadmi party will be fighting this election on its own strength in Delhi. There is no possibility of any alliance with congress. https://t.co/NgDUgQ8RDo
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 11, 2024
दुसरीकडे, आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी काँग्रेससोबतच्या आघाडीविषयी बोलताना, “काँग्रेससोबतच्या आघाडीच्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. कोणत्याही प्रकारच्या युतीचा प्रश्नच येत नाही. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू आणि जिंकू. ” असे त्यांनी म्हटले आहे. आम आदमी पार्टी दिल्लीत चौथ्यांदा सरकार स्थापन करणार असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला.
आप-काँग्रेस युतीबाबत चर्चा Delhi Assembly Election ।
आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात युतीच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या होत्या. दिल्ली काँग्रेसचे नेते आपसोबत युती करू इच्छित असल्याचा चर्चांना उधाण आले होते यानंतर आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते शरद पवार यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर दिल्लीत आप आणि काँग्रेसमध्ये युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
केजरीवाल यांनी यापूर्वीही युतीस दिला होता नकार Delhi Assembly Election ।
याआधीच अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत युती करण्यास नकार दिला होता. त्यातच पुन्हा एकदा दोन्ही पक्षांच्या युतीच्या बातम्यांनीसमोर येत होत्या. परंतु आता खुद्द अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेससोबत युतीची शक्यता नाकारली आहे.





