Delhi Airport : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील ‘इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळा वर (Delhi Airport) गुरुवारी एका मोठ्या दुर्घटनेतून शेकडो प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. विमानतळावर विमाने (Delhi Airport) धावपट्टीच्या दिशेने संथ गतीने जात असताना स्पाइसजेट आणि अकासा एअर या दोन कंपन्यांच्या विमानांच्या पंखांची एकमेकांना जोराची धडक बसली. या भीषण प्रसंगामुळे विमानतळ परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. Delhi Airport अधिकच्या माहितीनुसार, दोन्ही विमाने (Delhi Airport) आपल्या नियोजित उड्डाणासाठी धावपट्टीकडे मार्गस्थ होत होती. यावेळी अंतराचा अंदाज चुकल्यामुळे किंवा तांत्रिक त्रुटीमुळे दोन्ही विमानांच्या पंखांचे टोके एकमेकांवर घासले गेले. या धडकेत दोन्ही विमानांच्या पंखांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विमानतळ प्रशासनाने तात्काळ बचाव यंत्रणा आणि तांत्रिक पथकाला पाचारण केले. दोन्ही विमानांची उड्डाणे त्वरित रद्द करण्यात आली असून, त्यांना सुरक्षितपणे पार्किंग क्षेत्राकडे वळवण्यात आले आहे. विमानांची धडक बसली तेव्हा दोन्ही विमानांमध्ये प्रवासी आणि कर्मचारी उपस्थित होते. अचानक झालेल्या धक्क्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, दोन्ही कंपन्यांनी अधिकृत पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे की, सर्व प्रवासी आणि विमानातील कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत. कोणालाही साधी दुखापत देखील झालेली नाही, ही सर्वात मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. प्रवाशांच्या प्रवासाची पर्यायी व्यवस्था संबंधित विमान कंपन्यांकडून केली जात आहे.