Anmol Bishnoi । बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरण आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्याकांडातील मुख्य संशयित गँगस्टर अनमोल बिश्नोई (लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ) याला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात येत आहे. आज तो दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणार असून, NIA ची विशेष पथक टर्मिनल-३ वर दाखल झाले आहे. विमान सुमारे दीड तास उशिराने येणार असल्याचे समजते. NIA ताब्यात घेणार, नंतर केंद्र सरकारचा निर्णय Anmol Bishnoi । प्रक्रियेनुसार, विमान उतरताच राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) अनमोलला ताब्यात घेईल. त्यानंतर केंद्र सरकार ठरवेल की त्याला कोणत्या राज्य पोलिसांच्या ताब्यात द्यायचे. मुंबई पोलिसांनी सलमान खान गोळीबार प्रकरणात त्याला हवा असल्याने न्यायालयात ताबा मिळवण्यासाठी अर्ज दाखल करणार आहेत. अनेक राज्यांत गुन्हे, बनावट रशियन पासपोर्ट जप्त अनमोलविरुद्ध महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान आदी राज्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. NIA ने त्याच्या डोक्यावर १० लाखांचे बक्षीस घोषित केले होते. यंदाच्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत त्याला ताब्यात घेण्यात आले, तर त्याच्याकडून बनावट कागदपत्रांवर तयार केलेला रशियन पासपोर्ट जप्त झाला होता. मुंबई पोलिसांनी त्याच्या प्रत्यार्पणासाठी दोन वेळा प्रस्ताव पाठवले होते.सिद्धू मूसेवाला हत्याकांडातही नाव पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या २०२२ च्या हत्याकांडातही अनमोलचे नाव आरोपी म्हणून समोर आले आहे. बाबा सिद्दीकी हत्याकांड : २६ जण अटकेत, ३ हवे Anmol Bishnoi । १२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्र्यात झालेल्या बाबा सिद्दीकी हत्याकांडात आतापर्यंत २६ आरोपींना अटक झाली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मकोकाचे कलमही लावले आहे. अनमोल बिश्नोई, शुभम लोणकर आणि झीशान मोहम्मद अख्तर हे तिघे अद्याप फरार होते. अनमोलच्या भारतात दाखल होण्याने तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.दरम्यान, बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते झीशान सिद्दीकी यांनी सांगितले की, अनमोलला भारतात आणले जात असल्याची माहिती त्यांना ईमेलद्वारे मिळाली आहे. “त्याला योग्य शिक्षाच मिळायला हवी,” असे झीशान यांनी म्हटले आहे.अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणामुळे अनेक हाय-प्रोफाइल खटल्यांचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचणार असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.