Deepika Singh| अभिनेत्री दीपिका सिंहच्या डान्सची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Deepika Singh Troll| टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंह ‘दिया और बाती हम’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आली. टीव्हीवर सोज्वळ सुनेची भूमिका साकारणारी दीपिका खऱ्या आयुष्यात फार वेगळी आहे. दीपिका तिच्या डान्स रील्ससाठी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेतअसते. इन्स्टाग्राम रीलमध्ये ट्रेंड होत असलेल्या विविध गाण्यांवर ती डान्सचे व्हिडीओ शूट करून पोस्ट करते. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यानंतर तिला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे.
जॅकलीन फर्नांडिसच्या ‘यिम्मी यम्मी’ ट्रेडिंग गाण्यावर अनेकजण रील्स बनवत आहेत. यातच आता टीव्ही दीपिकाने देखील यावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पिवळ्या रंगाची साडी नेसून दीपिकाने डान्स केला आहे. परंतु तिचा डान्स चाहत्यांच्या पसंतीस पडलेला नाही.
‘माझ्या स्टाइलमध्ये ट्रेंड फॉलो करते’, असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर एकाने लिहिलं, ‘असा कोणता नाईलाज होता, ज्यामुळे हा व्हिडीओ पोस्ट करावा लागला?’ तर दुसऱ्या युजरने ‘तुम्ही अशी विचित्र रील का काढता?’, ‘या अभिनेत्रीला प्रत्येक ट्रेंड उद्ध्वस्त करण्याची सवय आहे,’ असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. Deepika Singh Troll|
View this post on Instagram
अभिनेत्री तिच्या देसी डान्समुळे नेहमीच चर्चेत असते आणि सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल केले जाते. सध्या कलर्सच्या शो ‘मंगल लक्ष्मी’मध्ये दिसणारी दीपिकाने शोच्या वेशभूषेत या गाण्यावर डान्स केला आहे. तिने पिवळी साडी नेसली होती तर यात ती जॅकलीन फर्नांडिसच्या स्टेप्सला देसी स्टाईलमध्ये फॉलो करताना दिसत आहे. Deepika Singh Troll|
दरम्यान, दीपिकाने 2011 मध्ये ‘दिया और बाती हम’ या स्टार प्लस वाहिनीवरील मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर 2018 मध्ये ती ‘द रिअल सोलमेट’ या वेब सीरिजमध्ये झळकली. 2022 नंतर ती कोणत्याही मालिकेत दिसली नाही. सध्या तिने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली असून ती कलर्सच्या नवीन टीव्ही शो ‘मंगल लक्ष्मी’मध्ये दिसत आहे.
हेही वाचा:
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर नाना पटोलेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले…





