Nana Patole on Eknath Khadse| मागील काही दिवसांपासून शरद पवार गटातील नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. तीन दशकाहून जास्त काळ भाजपात राहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आता पुन्हा भाजपाच्या वाटेवर असल्याची म्हंटले जात आहे.
खडसेंनी घेतली अमित शाह आणि जेपी नड्डा यांची भेट Nana Patole on Eknath Khadse|
एकनाथ खडसे नुकतेच दिल्लीला गेले होते. त्यावेळी खडसे यांनी गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्याचा फोटो समोर आला आहे. त्यामुळं खडसे लवकरच भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या सर्व चर्चांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले नाना पटोले ? Nana Patole on Eknath Khadse|
भाजपने एकनाथ खडसे यांचा छळ केला होता. त्यामुळे ते भाजपात जातील असं मला वाटत नाही, हे माझं मत आहे. भाजपकडे बलाढ्य नेता असताना त्यांना इतर पक्षातील लोकांची गरज का पडते? स्वयंघोषित विश्वगुरु सोबत असताना त्यांना इतर पक्षातील लोकांची गरज का पडते? भ्रष्टाचार करणारे लोक त्यांनी जमा केले देशाची संपत्ती लुटण्याच काम सुरू केलं. ते देशाच्या प्रश्नावर बोलत नाही. त्यामुळे एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार नाहीत, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपुरात बोलले.
सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद Nana Patole on Eknath Khadse|
सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध शिवसेना ठाकरे गट असा संघर्ष उभा राहिलेला आहे. या सांगली लोकसभा मतदारसंघातील जागेवर ठाकरे गटाने उमेदवार दिलेला आहे. मात्र सांगलीची जागा आमची आहे, असं म्हणत काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये संघर्ष सुरु आहे.
इतकेच काय तर, “संजय राऊत यांनी आपली नौटंकी बंद करावी. ते शिवसेनेचे नेते आहे त्यांनी सांभाळून बोलावं. वरिष्ठ पातळीवर तो तिढा एक दोन दिवसात पूर्ण होईल. सामोपचाराने हा तिढा सोडवू. संजय राऊत यांनी लहान कार्यकर्त्या प्रमाणे बोलू नये,” असा इशारा नाना पटोले यांनी संजय राऊत यांना दिला.
हेही वाचा:
“प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा, केंद्रात मंत्रिपद पण…” ; काँग्रेसची वंचितला आता आणखी एक नवीन ऑफर