Deepika Padukone in Hema Malini Biopic: “हेमा मालिनींच्या बायोपिकमध्ये दीपिका पादुकोणची एंट्री? ड्रीमगर्लनेच व्यक्त केली मोठी इच्छा”
Deepika Padukone in Hema Malini Biopic 'ओम शांती ओम'मधील दीपिकाचा रॉयल लुक, तिची अभिनयशैली आणि पडद्यावरील आत्मविश्वास यामुळे तिला त्या काळातील अभिनेत्रींची प्रतिमा प्रभावीपणे साकारता आली होती. त्यामुळे जर भविष्यात हेमा मालिनी यांच्या जीवनावर चित्रपट तयार झाला, तर दीपिका त्या भूमिकेसाठी योग्य पर्याय ठरू शकते, अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू झाली आहे.

Deepika Padukone in Hema Malini Biopic: बॉलिवूडच्या ‘ड्रीमगर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी चित्रपटसृष्टीत तब्बल 60 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. त्यांच्या अभिनयाने, सौंदर्याने आणि व्यक्तिमत्त्वाने अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या खास टप्प्याचे औचित्य साधत मुंबईत त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीचा गौरव करणारा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यावरील संभाव्य बायोपिकबाबतही एक महत्त्वाची इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान हेमा मालिनी यांना प्रश्न विचारण्यात आला की, त्यांच्या आयुष्यावर बायोपिक तयार झाला तर मुख्य भूमिका कोणत्या अभिनेत्रीने साकारावी, असे त्यांना वाटते? यावर त्यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाव घेतले. त्या म्हणाल्या, “दीपिकाची इच्छा असेल तर तिने ही भूमिका नक्कीच करावी. ती खूप सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे. अर्थात, ही भूमिका कोणीही साकारू शकते, पण दीपिका या भूमिकेसाठी योग्य ठरेल.” (Deepika Padukone in Hema Malini Biopic)

Hema Malini
हेमा मालिनी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या बायोपिकची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, दीपिका पादुकोणने 2007 मध्ये फराह खान दिग्दर्शित ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने साकारलेली ‘शांतीप्रिया’ ही भूमिका 70-80 च्या दशकातील अभिनेत्रींच्या शैलीवर आधारित होती. अनेकांनी या पात्रामध्ये हेमा मालिनी यांच्या व्यक्तिमत्त्वाची झलक पाहिली होती. (Deepika Padukone in Hema Malini Biopic)
‘ओम शांती ओम’मधील दीपिकाचा रॉयल लुक, तिची अभिनयशैली आणि पडद्यावरील आत्मविश्वास यामुळे तिला त्या काळातील अभिनेत्रींची प्रतिमा प्रभावीपणे साकारता आली होती. त्यामुळे जर भविष्यात हेमा मालिनी यांच्या जीवनावर चित्रपट तयार झाला, तर दीपिका त्या भूमिकेसाठी योग्य पर्याय ठरू शकते, अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू झाली आहे.
याआधीही हेमा मालिनी यांनी दीपिकावर विश्वास दाखवला होता. 2017 मध्ये प्रसिद्ध लेखक राम कमल मुखर्जी यांनी लिहिलेल्या ‘Hema Malini: Beyond the Dream Girl’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनासाठीही त्यांनी दीपिका पादुकोणची निवड केली होती. यावरून दोघींमधील परस्पर आदर आणि जिव्हाळा दिसून येतो.

Deepika Padukone
दरम्यान, मुंबईत झालेल्या ‘Celebrating the Dreamgirl’s Diamond Jubilee’ या विशेष कार्यक्रमात हेमा मालिनी यांच्या सहा दशकांच्या कारकिर्दीचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी गाणी आणि सादरीकरणातून त्यांच्या चित्रपट प्रवासाला सलाम केला. बॉलिवूडमधील अनेक मान्यवर कलाकारही या सोहळ्याला उपस्थित होते.
या कार्यक्रमाबद्दल भावना व्यक्त करताना हेमा मालिनी म्हणाल्या, “हा सोहळा माझ्या आयुष्यात कायम लक्षात राहील. चित्रपटसृष्टीतील 60 वर्षांचा प्रवास इतक्या भव्य पद्धतीने साजरा होईल, अशी अपेक्षा नव्हती. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आणि प्रतिसाद माझ्यासाठी खूप मोलाचा आहे.” (Deepika Padukone in Hema Malini Biopic)
याच मुलाखतीत त्यांनी पती आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दलही भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, आयुष्यात संकटे येतच असतात, पण त्यातून धैर्याने बाहेर कसे पडायचे, हे धर्मेंद्र यांनी शिकवले. ते प्रेमळ वडील आणि उत्तम आजोबा आहेत. त्यांनी नेहमीच कुटुंबाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. कितीही काम असले तरी कुटुंबासाठी वेळ काढा आणि सर्वांनी एकत्र राहा, हा त्यांचा कायमचा संदेश असल्याचे हेमा मालिनी यांनी सांगितले.
सध्या हेमा मालिनी यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या बायोपिकची चर्चा रंगली असून, त्यात दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत झळकणार का, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





