दीपिकाने इन्स्टाग्रामवरील नावात केला बदल; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

मुंबई– अभिनेत्री दीपिका पदुकोणचे भारतासह जगभरात चाहते आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्येसुद्धा दीपिकाने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र सध्या दीपिका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील नावात मोठा बदल केला आहे. ज्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अभिनेत्रीने आपले नाव ‘दीपिका पादुकोण’ असे हिंदीमध्ये लिहिले आहे. यापूर्वी दीपिकाच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये इंग्रजीत नाव दिसायचे, परंतु अलीकडेच स्वत:चे नाव तिने हिंदीमध्ये अपडेट केले आहे. यावरून तिला हिंदी भाषेविषयी असलेलला आदर दिसून येतो. दीपिका अनेकदा परेदशात गेली आहे. मात्र तिने नेहमीच भारतीय संस्कृती जोपासली आहे.
टाइम मॅगझिनमधील मुलाखतीत दीपिका म्हणाली होती की, ‘माझ्या देशाचा जगभरात प्रभाव पाडणे हे माझे ध्येय आहे. भारतीय सिनेमा एवढ्या दूरवर पोहोचला आहे की, तुम्हाला कुठेही गेलात तरी प्रसिद्धी मिळते.’ यावरून दीपिका खऱ्या अर्थाने भारताचे प्रतिनिधित्व करत असल्याने तिने हिंदीमध्ये नाव अपडेट केल्याचे तिचे चाहते म्हणत आहेत.
दरम्यान, टाइम मॅगझिनच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवणारी दीपिका ही सहावी भारतीय सेलिब्रिटी आहे. यापूर्वी ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, परवीन बाबी, आमिर खान आणि शाहरुख खान या कलाकारांना या कव्हर पेजवर स्थान मिळाले होते.
दीपिकाच्या आगामी प्रोजेक्ट बाबत बोलायचे झाल्यास ती अभिनेता प्रभास आणि अमिताभ बच्चन स्टारर एका बड्या चित्रपटात दिसणार आहे. तसेच हृतिक रोशनसोबत फायटर या एका अॅक्शन चित्रपटात देखील दीपिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे.





