Video : गरोदरपणात दीपिकाने बजावला मतदानाचा हक्क; गर्दीत पत्नीची काळजी घेताना दिसला रणवीर

Deepika Padukone | Baby Bump । Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली असून, दोन केंद्रशासित प्रदेशांसह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या सहा राज्यांतील 49 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
मुंबईतील मतदान केंद्रावर बॉलिवूड स्टार्स आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. सोमवारी सकाळी बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि फरहान अख्तर मुंबईतील मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे असल्याचे दिसले.
बॉलिवूड स्टार अक्षय कुमार मतदान करण्यासाठी मुंबईतील जुहू येथील मतदान केंद्रावर पोहोचला. याशिवाय अभिनेत्री जान्हवी कपूरही सेंट ॲन्स स्कूलमध्ये मतदान करण्यासाठी पोहचली.
तर मुंबईतील जुहूच्या गांधीग्राम शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर अभिनेत्री शुभा खोटे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावला.
तर दुसरीकडे अभिनेत्री दीपिका पादुकोणसुद्धा पती रणवीर सिंहसोबत मतदान करण्यासाठी पोहोचली. रणवीर आणि दीपिकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
मतदान करण्यासाठी केंद्रावर पोहोचलेल्या दीपिकाच्या बेबी बंपकडेच सर्वांचं लक्ष वेधलं होतं. फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. दीपिका आणि रणवीर लवकरच आई-बाबा होणार आहेत.
या व्हिडीओमध्ये दीपिकाचं बेबी बंप स्पष्ट पहायला मिळतंय. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स घातला होता. गर्दीतून पुढे येताना ती तिच्या पोटावर हात ठेवून स्वत:ला सांभाळताना दिसते. तर रणवीरसुद्धा तिची काळजी घेताना दिसतोय.
पाचव्या टप्प्यात एकूण 49 जागांवर मतदान
दरम्यान, आज पाचव्या टप्प्यात लोकसभेच्या 49 जागांसाठी एकूण 695 उमेदवार रिंगणात आहेत. यात उत्तर प्रदेशातील 14, महाराष्ट्रातील 1 , पश्चिम बंगालमधील 7, बिहारमधील 5 ,
झारखंडमधील 3 , ओडिशातील 5 आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात एकूण 49 जागांवर मतदान होत आहे.





