दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन यांचा ‘पिकू’ सिनेमा पुन्हा रिलीज होणार

Deepika Padukone And Amitabh Bachhan | अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन यांची मुख्यभूमिका असलेला ‘पिकू’ चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 8 मे 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलीच कमाई केली होती. आता या चित्रपटाबाबत दीपिकाने एक पोस्ट शेअर केली आहे.
दीपिकाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “पिकू माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ आहे. हा चित्रपट १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ९ मे २०२५ रोजी पुन्हा एकदा थिएटरमध्ये येत आहे. इरफान आम्हाला तुझी वारंवार आठवण येते.” तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी पोस्ट करत सिनेमा पाहण्यासाठी आतुर असल्याचं म्हटलं आहे.
View this post on Instagram
सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. अलिकडेच सिनेमागृहांमध्ये ‘सनम तेरी कसम’, ‘रहना है तेरे दिल में’ तसेच ‘तुझे मेरी कसम’ यांसारखे गाजलेले सिनेमे रि-रिलीज करण्यात आले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. आता अभिनेत्री दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन यांचा ‘पिकू’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे.





