मॅटरनिटी ब्रेकनंतर कामावर परतणार दीपिका, 1000 कोटींच्या चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका

Deepika Padukone New Movie: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने मागच्या वर्षी बाळाला जन्म दिला होता. बाळाच्या जन्मानंतर दीपिकाने कामापासून ब्रेक घेतला होता. मात्र, आता मॅटरनिटी ब्रेकनंतर दीपिका लवकरच शूटिंगला सुरुवात करणार आहे. ती लवकरच ‘कल्की 2898 एडी पार्ट 2’च्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे समोर आले आहे.
वर्ष 2024 मध्ये दीपिकाचे ‘कल्की 2898 एडी’ आणि ‘सिंघम अगेन’ हे दोन चित्रपट रीलिज झाले होते. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. ‘कल्की 2898 एडी’च्या पहिल्या भागाने 1 हजार कोटींपेक्षा अधिकची कमाई केली होती. त्यामुळे चाहते आता तिच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत.
नुकतेच, दीपिकाने 5 जानेवारीला तिचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त ‘कल्की 2898 एडी’च्या निर्मात्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला शुभेच्छा देण्यात आल्या. दीपिकाचा चित्रपटाच्या शूटिंगचा व्हीडिओ देखील शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून दीपिका लवकरच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग करण्यासाठी सेटवर परतणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
View this post on Instagram
दीपिका ‘कल्की 2898 एडी’च्या दुसऱ्या भागाचे शूटिंग कधी सुरू करणार याबाबतची तारीख अद्याप समोर आली नसली तरीही या भागात तिची भूमिका महत्त्वाची असणार आहे. या चित्रपटात तिने सुमतीची भूमिका साकारली आहे. त्यामुळे दुसऱ्या भागात देखील तिची महत्त्वाची भूमिका असेल.
‘कल्की 2898 एडी – 2’ मध्ये दीपिकासोबतच सुपरस्टार प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हसन देखील प्रमुख भूमिकेत दिसतील. चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन हे करत आहेत. आतापर्यंत चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे 35 टक्के शूटिंगही पूर्ण झाले आहे.





