Manchar : कांद्याच्या बाजारभावात घसरण
Manchar : नवीन कांदा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली. अशी माहिती बाजार समितीचे सभापती निलेश थोरात यांनी दिली.

मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मंगळवारी कांद्याची २१ हजार ८०० पिशव्यांची आवक झाली. दहा किलो कांद्यासाठी 451 रुपये बाजार भाव मिळाला. नवीन कांदा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली. अशी माहिती बाजार समितीचे सभापती निलेश थोरात यांनी दिली.
बेंगळुरू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून नवीन कांदा बाजारात आला आहे त्यामुळे बाजारभावात घसरण झाल्याचे सांगण्यात आले. कांद्याला प्रति १० किलो ४५१ रुपये असा उच्चांकी दर मिळाला. सुपर गोळे कांद्याला ४३० ते ४५१ रुपये, सुपर मुक्कल कांद्याला ३९० ते ४२५ रुपये, सरासरी मध्यम कांदा क्रमांक दोनला ३६० ते ३८५ रुपये, गोल्टी व गोल्टा कांदा क्रमांक चारला २३० ते ३२० रुपये, तर बदला व चिंगळी कांद्याला ७० ते २२० रुपये असा दर मिळाला. अपवादात्मक गोळे कांद्याला ४५० ते ४७० रुपये दर मिळाल्याची माहिती उपसभापती सचिन हरिभाऊ पानसरे यांनी दिली.
बेंगळुरू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून नवीन कांद्याची आवक वाढल्याने बाजारभावावर परिणाम झाला आहे. आवक वाढल्यामुळे सध्या कांद्याच्या दरात घसरण झाली असली तरी गुणवत्तापूर्ण कांद्याला चांगला दर मिळत आहे.
-निलेश थोरात, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर.





