“दाढी न ठेवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु…” राहुल गांधींनी वाढलेल्या दाढीबाबत स्पष्टचं सांगितले

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा पूर्ण झाली. काँग्रेस पक्षाला या यात्रेचा चांगला फायदा होण्याची शक्यता अनेकांकडून वर्तवली जात आहे. या यात्रेमुळे राहुल गांधी यांच्यात देखील अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या बदललेल्या लूकची चांगलीच चर्चा आहे. वाढलेली दाढी आणि पांढरा टी शर्ट ही जणू राहुल गांधींची नवीन ओळख बनली आहे. नुकतंच राहुल गांधींना तुम्ही ही दाढी केव्हा कापणार असा प्रश्न एका मुलाखतीत विचारण्यात आला.
एका इटालियन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी विवध विषयांवर भाष्य केले. आपल्या कुटुंबियाबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले,मी माझ्या आजीचा म्हणजेच इंदिरा गांधी यांचा आवडता नातू होतो. तसेच कन्याकुमारी ते काश्मीर या दरम्यान केलेल्या ‘भारत जोडो यात्रेचे अनेक अनुभव यावेळी राहुल गांधींनी सांगितले. यावेळी गांधी यांना त्यांच्या वाढलेल्या दाढीबाबत देखील सवाल विचारण्यात आला.
भारत जोडो यात्रेदरम्यान दाढी खूप मोठी झाली. त्यावर राहुल गांधी म्हणाले,मी संपूर्ण प्रवासात दाढी न ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता मी ठरवेन दाढी ठेवायची की नाही असं अगदी साधेपणाने राहुल गांधींनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी राहुल गांधींनी आपले कुटुंब आणि राजकारणावर देखील भाष्य केले.
सध्या देशात सुरु असलेलं वातावरण पाहता देश हुकूमशाहीकडे चालला असल्याचे देखील राहुल गांधी यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदींचा पराभव होऊ शकतो का ? असा सवाल विचारला असता ते म्हणाले,जर सर्व विरोधक एक झाले तर शंभर टक्के त्यांचा पराभव ठरलेला आहे. असा विश्वास राहुल गांधींनी यावेळी व्यक्त केला.





