Pune: डेक्कन क्वीन आली नटून-सजून…

पुणे – मुंबईतील रेल्वे मेगा ब्लाॅकमुळे रद्द झालेली डेक्कन क्वीन जोरदार भोंगा वाजवत पुणे रेल्वे स्थानकावर आली. मात्र, ती प्रवाशासाठी नव्हे तर प्रवाशांकडून लाडक्या डेक्कन क्वीनचा 95 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी नटून-सजून आली होती. त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते केक कापून डेक्कन क्वीन चा जल्लोषामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला.
पुणे-मुंबई-पुणे दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची जीवनवाहीनी असलेल्या डेक्कन क्वीन रेल्वे गाडीचा शनिवारी (दि. १) रेल्वे प्रवासी ग्रुपच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बाबा मगर, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा, मध्य रेल्वे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी रामपाल बडपग्गा यासह अन्य मान्यवर व प्रवाशी उपस्थित होते. मेगा ब्लाॅकमुळे डेक्कन क्वीन रद्द असतानाही यार्डातून प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर वाढदिवस साजरा करण्यासाठी आली, त्यासाठी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांनी विशेष सहकार्य केले. प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा
मी पाच वर्षाची असल्यापासून…
दी ग्रेट इंडीया पॅनासुलर रेल्वे (जीआयटीआर) यांनी दिनांक 1 जून 1930 रोजी पुणे-मुंबई-पुणे या मार्गावर ईलेक्ट्रिक, हायस्पीड, कंफर्ट, लक्झरी, डिलक्स सुविधांनी परिपुर्ण अशी डेक्कन क्वीन ही रेल्वे गाडी सुरू केली. ती आता मध्य रेल्वे अंतर्गत सुरू आहे. ही जगातील एकमेव ट्रेन आहे, जिचा वाढदिवस साजरा होत असतो. मी पाच वर्षाची असल्यापासून वाढदिवस साजरा करते, अशा भावना हर्षा शहा यांनी व्यक्त करत, डेक्कन क्वीन चा वाढदिवस हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय असल्याचे सांगितले.





