Mukta Barve : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वेला प्रदान करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार मुक्ता बर्वे हिला प्रदान करण्यात आला. मुक्ता बर्वेने चकवा या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर तिने जोगवा या चित्रपटात साकारलेल्या सुली या भूमिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. यानंतर मुक्ताने कधी मागे वळून पाहिलं नाही, तिने अनेक चित्रपटातून काम करत ती प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली. तिच्या या कामाची दखल घेत महाराष्ट्र शासनाचा चित्रपती कै. व्ही. शांताराम पुरस्कार देऊन तिचा गौरवा केला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुक्ताचा आनंद गगणात मावेनसा झाला होता. आता जबाबदारी वाढली असल्याचं मोठं स्टेटमेंट तिने यावेळी बोलताना केलं. काय म्हणाली मुक्ता? माझी आई इथं आली आहे, ती नक्कीच ती रडत असणार….खरंतर चकवा या चित्रपटातून सिनेमात पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटाने पुरस्कार मिळवून दिला. यानंतर अनेक चित्रपट केले. मला केवळ कृतज्ञता हाच शब्द सुचतोय. हा पुरस्कार म्हणजे, आतापर्यंत बरी वागली आहेस, आता ह्यापुढे आणखी अपेक्षा आहेत. आणि तुमच्या या अपेक्षा मी नक्कीच पूर्ण करेन. धंन्यवाद! अशी प्रतिक्रिया मुक्ताने पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिली. खरंतर मुक्ता बर्वेने नाटक, सिनेमा या माध्यमांत आपले नावलौकीक केलं आहे. तिने आजवर अनेक भूमिका साकलेल्या आहेत. तिच्या भूमिका या लक्षवेधी स्वरुपाच्या राहिलेल्या आहेत. आजही तिचा जोगवा हा चित्रपट प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. महेश मांजरेकर काय म्हणाले? या पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार मिल्यानंतर त्यांनी व्ही शांतरामांची एक आठवण सांगितली. तसेच नव्या दिग्दर्शकांना सांगावंसं वाटतं की, त्यांच्यासारखे सिनेमे आज निघत नाही आणि त्यांच्या नावाचा मला पुरस्कार मिळणं ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. कारण, आताचे जे दिग्दर्शक आहे, त्यांच्या कॉम्पिटिशनला उतरणं खूप गरजेचं आहे. पुन्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांचे आभार. हेही वाचा : उद्धव ठाकरे आज दिल्लीच्या दौऱ्यावर; इंडिया आघाडीच्या बैठकीकडे लक्ष, रणनीती ठरणार?