“डोळ्यावर गॉगल, कपाळावर मोठी टिकली अन्…”; मुक्ता बर्वेचे मालिकाविश्वात कमबॅक

Mukta Barve | मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वेने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय तिने मालिकांमध्ये देखील काम केले आहे. आता पुन्हा एकदा मुक्ता मालिका विश्वात एन्ट्री करणार आहे. कलर्स मराठीवरील मालिकेतून ती आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
मुक्ता बर्वे कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेत झळकणार आहे. मुक्ताची भूमिका असणारा मालिकेचा प्रोमो मंगळवारी रिलीज करण्यात आला आहे. कपाळावर मोठी टिकली, गळ्यात माळा, साडी आणि डोळ्यावर गॉगल लावून जबरदस्त अंदाजात मुक्ताची मालिकेत एन्ट्री होणार आहे. या प्रोमोत आलिशान गाडीतून मुक्ताची एन्ट्री होते. तेव्हाच आनंदीबाई मुक्ताला हार घालायला जातात. पण मुक्ता त्यांना बाजूला सारुन इंदू आणि तिच्या गँगसोबत मनसोक्त खेळते.
View this post on Instagram
मध्यंतरीचा काही काळ मुक्ताने छोट्या पडद्यापासून ब्रेक घेतला होता. यादरम्यान ती चित्रपट व नाटकांमध्ये सक्रियरित्या काम करत होती. आता मुक्ता बर्वेची ‘कलर्स मराठी’च्या ‘इंद्रायणी’ मालिकेत नव्या पाहुणीच्या भूमिकेत हटके एन्ट्री होणार आहे.
इंद्रायणी’ मालिकेचा हा विशेष भाग १६ नोव्हेंबरला संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. ‘इंद्रायणी’ मालिकेच्या निमित्ताने तीन वर्षांनी मुक्ताची मराठी मालिकेत एन्ट्री होणार आहे. याआधी मुक्ता २०२१ मध्ये सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ मालिकेत दिसली होती. यापूर्वी मुक्ता ‘अग्निहोत्र’, ‘अजूनही बरसात आहे’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘रुद्रम’ या मालिकांमध्येही झळकली आहे.
हेही वाचा:
पाकिस्तानात अल्पवयीन हिंदू मुलींचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला ; परिसरात भीतीचे वातावरण





