नवी दिल्ली – इंडिया टिव्हीचे प्रमुख संपादक रजत शर्मा यांना अज्ञात व्यक्तीने ठार मारण्याची धमकी दिली असल्यामुळे त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. पोलिसांनी त्यांचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी दाखल करून घेतला असून त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.
2021 मध्ये रजत शर्मा यांनी स्वयंभू भगवान यावर एक विशेष कार्यक्रम तयार केला होता. तेव्हाही त्यांना ठार मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. तेव्हाही त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली होती. त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्यांना अज्ञात व्यक्तीने धमकावले आहे.
सोनिया गांधी यांची गुरुवारी ईडी चौकशी
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना अगोदर फोनवर धमकावण्यात आले. त्यानंतर चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या ग्रेटर कैलाश येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या दिवसभराच्या वेळापत्रकाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. शर्मा यांना खासगी सुरक्षा आहे. मात्र तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी आता पोलीस संरक्षणाचीही मागणी केली आहे.