\n
मिळालेल्या माहितीनुसार, फोनवरून ही धमकी मिळाल्यानंतरच दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. फोन करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक पथक तैनात केले आहे.
\nएका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘त्या व्यक्तीला दारूचे व्यसन आहे आणि लवकरच त्याला पकडले जाईल. “आम्ही त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधला. तो मद्यपी असून काल रात्रीपासून दारू पितो. सध्या तो घरी नाही. तो लवकरच पकडला जाईल.”
\nदरम्यान,अज्ञात फोनवरून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही पोलिसांना धमकीचे फोन आले आहेत.
\n