अभिनेत्री उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

मुंबई – मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या अतरंगी ड्रेसमुळे अनेकदा ट्रोल होते. बहुदा उर्फीला याची सवय झालेली असावी. मात्र, अतरंगी स्टाईल मुळे अभिनेत्री उर्फी जावेद हिला काहीदिवसांपूर्वी बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. स्वतः हा अभिनेत्रीने याबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्स सोबत शेअर केली होती. मात्र, आता उर्फीला बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गोरेगाव पोलिसांनी या व्यक्तीला अटक केलीये. नवीन गिरी असं आरोपीचं नाव आहे.
अभिनेत्रीने याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तक्रारीनंतर गोरेगाव पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला बिहारमधून अटक केलीये. गोरेगाव पोलिसांनी आरोपी नवीन गिरीला आयटी कायद्याच्या कलम 354, (ए), 354 (डी), 509, 506 अन्वये अटक केली असून, त्याची रवानगी कारागृहात केली आहे.
अभिनेत्रीला व्हॉट्सअॅपवर मेसेज करून बलात्कार करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली नवीन गिरीने दिली होती. मात्र, अभिनेत्री उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘धमकी देणाऱ्या व्यक्तीला मी ओळख असल्याचे असून, त्याचे नवे देखील तुम्हाला सांगत आहे. ‘ असं म्हंटल होत.
दरम्यान, सध्या उर्फी आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी दुबईमध्ये आहे. दुबईत देखील उर्फी आपल्या अतरंगी अंदाजात वावरताना दिसते. परंतु हाच अंदाज आता उर्फीला चांगलाच महागात पडला आहे. दुबई पोलिसांनी उर्फीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. भारता व्यतिरिक्त इतर देशांमध्ये महिलांनी कसे कपडे घालावेत याबाबत काही नियम ठरवून दिलेले आहेत.
उर्फीने अतरंगी पोशाखात एक व्हिडीओ शूट केला होता ज्यामुळे दुबईतील नागरिकाने तिच्याविरोधात तक्रार दिल्याचे समजते. दुबई पोलिसांना तक्रार मिळताच त्यांनी उर्फीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. उर्फीला आपल्या अतरंगी स्टाईलमुळे थेट विदेशात देखील अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं यातून दिसत आहे.





