PSI Vijay Gaikwad : सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी अपघात; कर्तव्यदक्ष PSI विजय गायकवाड यांचा मृत्यू
PSI Vijay Gaikwad : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंगी गडावर भाविकांच्या गर्दीचे नियोजन आणि बंदोबस्त सांभाळणाऱ्या पोलीस पथकासह भाविकांवर काळाने घाला घातला आहे.

PSI Vijay Gaikwad : नवरात्रीनिमित्त सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बंदोबस्त तैनात असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास वणीकडून येणाऱ्या भरधाव कारने पोलिसांसह भाविकांना धडक दिल्याची घटना घडली. (PSI Vijay Gaikwad)
या अपघातात तीन पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि दर्शनासाठी आलेले सात भाविक जखमी झाले. यात जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही जखमी भाविकांना वणी येथून नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. (PSI Vijay Gaikwad)
या घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, वाहतूक पोलीस सचिन राऊत हे जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच दर्शनासाठी आलेले कपिल साळी, मोरेश्वर पाटील, गोपाळ सोनवणे, दुर्गेश चौधरी, सोहम पवार, राजाराम जाधव आणि राधाबाई गावित हे भाविकही जखमी झाले आहेत. (PSI Vijay Gaikwad)
माहितीनुसार, मध्यरात्री दोनच्या सुमारास कारमधून काही जण सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येत होती. यावेळी अभोणा वळण रस्त्यावर नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी तसेच वाहतूक वळविण्याच्या कामासाठी पोलीस तैनात होते. (PSI Vijay Gaikwad)
याचठिकाणी संबंधित कारने पोलिसांसह दर्शनासाठी आलेल्या भाविकांना जोरदार धडक दिली. या कारमधील चार जणांपैकी दोनजण अपघातानंतर फरार झाले असून, दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या महिला अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यातील देवठाण येथील असल्याची माहिती आहे. (PSI Vijay Gaikwad)
Ship Capsized : समुद्रात मोठी दुर्घटना! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू





