Deandra Dottin Bowled : एकही चेंडू न खेळता दिग्गज फलंदाज कशी झाली बोल्ड? रिकाम्या स्टंप्सवर गोलंदाजी पाहून क्रिकेट चाहते थक्क! पाहा VIDEO
Deandra Dottin Bowled WBBL : महिला बिग बॅश लीग २०२६ च्या ३३ व्या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्स महिला संघाची फलंदाज डिएंड्रा डॉटिन एकही धाव न काढता बाद झाली. तिला फ्री बॉल देण्याच्या नवीन नियमाची फटका बसला.

Deandra Dottin gets bowled by Sarah Glenn without facing a delivery : महिला बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हीट विमेन आणि मेलबर्न रेनेगेड्स विमेन यांच्यातील सामन्यात क्रिकेट चाहत्यांना थक्क करणारे दृश्य पाहायला मिळाले. मेलबर्नच्या डावातील पंधराव्या षटकात वेस्ट इंडिजची दिग्गज अष्टपैलू डिएन्ड्रा डॉटिन निर्धारित वेळेपेक्षा उशिराने क्रीजवर पोहोचली. त्यामुळे गोलंदाज सारा ग्लेनला रिकाम्या स्टंप्सवर चेंडू टाकण्याची संधी मिळाली आणि डॉटिन एकही चेंडू न खेळता त्रिफळाचित झाली.
७५ सेकंदांच्या मर्यादेत क्रीझवर पोहोचण्यास डॉटिन अपयशी –
ही संपूर्ण घटना मेलबर्न रेनेगेड्सच्या डावातील पंधराव्या षटकात घडली, जेव्हा एक गडी बाद झाल्यानंतर डिएन्ड्रा डॉटिन नवीन फलंदाज म्हणून मैदानात उतरली. महिला बिग बॅश लीगच्या नियमांनुसार, नवीन फलंदाजाला निर्धारित वेळेत क्रीझवर पोहोचून गार्ड घेत पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार राहावे लागते. मात्र, डॉटिनला क्रीझपर्यंत पोहोचण्यासाठी ७५ सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला आणि तिथेच चूक झाली.
सारा ग्लेनचा अचूक वेध अन् डॉटिन माघारी –
निर्धारित वेळ संपल्याचे लक्षात येताच मैदानावरील पंचांनी तात्काळ स्पर्धेचा खास नियम लागू केला. या नियमानुसार डिएन्ड्रा डॉटिनला खेळपट्टीच्या बाजूला सरकावे लागले आणि इंग्लंडची लेग स्पिनर सारा ग्लेनला फलंदाजाशिवाय थेट स्टंप्सवर चेंडू टाकण्याची परवानगी मिळाली. सारा ग्लेनने या संधीचा पुरेपूर फायदा घेत अचूक निशाणा साधला आणि चेंडू स्टंप्सवर आदळताच डॉटिनला माघारी परतावे लागले.
डब्ल्यूबीबीएलचा ‘फ्री बॉल एट स्टंप्स’ नियम काय?
Extraordinary.
Deandra Dottin was late to the middle. Now she’s out after Sarah Glenn hit the stumps with a ball she couldn’t face! #WBBL12 https://t.co/lsG3SZAw8b
— Weber Women’s Big Bash League (@WBBL) November 25, 2026
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘टाईम्ड आऊट’ नियमापेक्षा वेगळा असा हा ‘फ्री बॉल एट स्टंप्स’ नियम सामन्याची गती कायम ठेवण्यासाठी बनवला आहे. यानुसार गडी बाद झाल्यावर किंवा फलंदाज रिटायर्ड हर्ट झाल्यावर नवीन फलंदाजाकडे क्रीजवर येऊन पहिल्या चेंडूसाठी तयार होण्यास ७५ सेकंद असतात. या वेळेत पोझिशन घेण्यात अपयश आल्यास फलंदाज थेट बाद न होता बाजूला सरकतो.
चेंडू हुकल्यास फलंदाजाला मिळते खेळण्याची दुसरी संधी –
Deandra Dottin was bowled without even reaching the crease! Sarah Glenn hit the stumps while Dottin was still making her way in, resulting in one of the most unusual dismissals in cricket.
The reason? She was simply too late to arrive! 😭🔥 https://t.co/RPuhYr1pTa
— India Spectator (@IndiaSpectator1) November 25, 2026
फलंदाज बाजूला सरकल्यानंतर गोलंदाजाला रिकाम्या स्टंप्सवर एक चेंडू टाकण्याची संधी दिली जाते. हा चेंडू थेट स्टंप्सवर आदळल्यास फलंदाजाला बाद मानले जाते, जसे डॉटिनच्या बाबतीत घडले. याउलट, जर गोलंदाजाचा निशाणा चुकला आणि चेंडू स्टंप्सला लागला नाही, तर तो डॉट बॉल गणला जातो व फलंदाजाला पुन्हा गार्ड घेऊन आपली खेळी सुरू करता येते.





