वापरातील मोटार कारला एअरबॅगसाठी डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली – सध्या वापरात असलेल्या मोटार कारला पुढील दोन आसनांसाठी एअर बॅगची सक्ती करण्यात आली आहे. तथापि, या सक्तीला आता केंद्रीय परिवहन मंत्रालयाने 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
कोविडच्या कारणामुळे या मुदतीस वाढ देण्यात येत असल्याचे या मंत्रालयाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सध्या केवळ चालकाच्या सीटपुढे एअरबॅगची सक्ती लागू आहे. ही सक्ती लागू करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी द सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबॉईल मॅन्युफॅक्चरर्स यांनी केली होती.
ही सक्ती नवीन कारसाठी लागू झाली आहे. सध्याच्या वापरातील मोटार कारसाठी ही सोय करून घेण्यासाठी लोकांना करोनामुळे वेळ लागू शकतो. करोना काळात अनेक ठिकाणी निर्बंध लागू आहेत. त्यामुळे लोकांना ही सोय करणे जिकिरीचे आहे, असे या संघटनेने केंद्रीय परिवहन मंत्रालयाला कळवले होते. त्यांच्या मागणीचा विचार करून ही मुदतवाढ देण्यात आली आहे.



