De De Pyaar De 2 Box Office Collection : ‘दे दे प्यार दे 2’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम; 10 दिवसांत केलं मोठी कमाई !

De De Pyaar De 2 Box Office Collection : अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह यांची रोमँटिक कॉमेडी फिल्म ‘दे दे प्यार दे 2’ प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले असून, या कालावधीतही चित्रपटाची कमाई स्थिर गतीने सुरू आहे.
14 नोव्हेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटासमोर 21 नोव्हेंबरला ‘मस्ती 4’ आणि ‘120 बहादुर’ ही दोन नवीन चित्रपट स्पर्धेत उतरले. मात्र या स्पर्धकांनाही अजय देवगणच्या चित्रपटाची ओढ कमी करता आली नाही. थिएटरमध्ये प्रेक्षकांची पसंती ‘दे दे प्यार दे 2’लाच जास्त मिळत असल्याचं दिसून येत आहे.
View this post on Instagram
१० दिवसांचा बॉक्स ऑफिस कलेक्शन : ‘दे दे प्यार दे 2’ ने पहिल्या आठवड्यात 51.1 कोटी रुपये कमावले.
८व्या दिवशी कमाई – 2.25 कोटी
९व्या दिवशी कमाई – 4 कोटी
१०व्या दिवशी (आज) संध्याकाळी 7:05 वाजेपर्यंत – 3.44 कोटी
यासह चित्रपटाचा एकूण कलेक्शन 60.79 कोटी रुपये इतका झाला आहे.
बजेट वसुलीपासून किती दूर आहे चित्रपट?
चित्रपट सुमारे 100 कोटींच्या बजेटमध्ये तयार केला असून, 9 दिवसांत वर्ल्डवाइड कलेक्शन 87 कोटी रुपये झाले आहे. यामध्ये आजचा भारतातील तात्पुरता आकडा धरला, तर चित्रपटाने आपले 90% बजेट वसूल केले आहे. म्हणजेच आणखी 10 कोटी कमावले की चित्रपट पूर्णत: बजेटच्या पलीकडे जाईल.
रकुल प्रीतच्या करिअरमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी फिल्म :
‘दे दे प्यार दे 2’ हा चित्रपट रकुल प्रीतच्या करिअरमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी फिल्म ठरला आहे. पहिल्या स्थानावर 2019 मधील ‘दे दे प्यार दे’ (104.13 कोटी) हा चित्रपट आहे. आणि सध्या सिनेमागृहात सुरु असलेला ‘दे दे प्यार दे 2’ चित्रपट.





