DCM Eknath Shinde Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी (DCM Eknath Shinde Politics) थांबलेल्या नाहीत. निवडणुकीपूर्वी तिकिटांसाठी पक्ष बदलणारे नेते आता निवडणुकीनंतरही पक्ष सोडत असल्याचे चित्र समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपूर आणि मंगळवेढा येथील तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये (DCM Eknath Shinde Politics) मोठी फूट पडल्याचे समोर आले आहे. या फुटीमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पंढरपूर नगरपरिषदेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे वर्चस्व आहे. मात्र, या आघाडीतील प्रमुख नेत्यांनी शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीत तीव्र मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भालके कुटुंबीय आणि अनिल सावंत यांचा शिवसेना प्रवेश तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके, पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत हे तिघे १२ एप्रिल २०२६ रोजी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या प्रवेश सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा (DCM Eknath Shinde Politics) पंढरपूर दौरा नियोजित असल्याचे सांगितले जात आहे. या तिन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी राजकीय खेळी असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. DCM Eknath Shinde Politics आघाडीत फूट: मंगळवेढ्यातील नेत्यांची नाराजी भगीरथ भालकेंच्या शिवसेना प्रवेशाच्या निर्णयानंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. मंगळवेढा येथील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षा सुनंदा बबनराव आवताडे यांचे पती आणि ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांनी भालकेंविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. काय म्हणाले बबनराव आवताडे? “आमच्या मंगळवेढ्यात तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे २० नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष मिळून एकूण २१ जण आहेत. आम्ही शिवसेनेत प्रवेश करणार नाही. आमची आघाडी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. मात्र, भालकेंच्या पक्षप्रवेशाबाबत आम्हाला काहीच माहिती नव्हती. कोणत्याही बैठका झाल्या नाहीत, कोणी निरोप दिला नाही. हे अचानक ठरले आहे. आम्ही कोणीही जाणार नाही. आमच्या आघाडीचे अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू.” बबनराव आवताडे यांनी स्पष्ट केले की, मंगळवेढ्यातील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व नगरसेवक भालकेंसोबत जाणार नाहीत आणि ते आघाडीसोबत भक्कमपणे उभे राहतील. या घडामोडींमुळे पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात नवे समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही स्थानिक स्तरावर प्रभावशाली आघाडी मानली जाते. आघाडीत पडलेली फूट आणि काही नेत्यांचा शिवसेनेकडे झुकलेला कल यामुळे महायुती आणि विरोधक दोघांनाही नवे संकेत मिळाले आहेत. भगीरथ भालके, प्रणिता भालके आणि अनिल सावंत यांच्या १२ एप्रिलच्या प्रवेश सोहळ्यानंतर पंढरपूरच्या राजकीय चित्रात काय बदल होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.