Virat Kohli’s taunts KL Rahul after DC vs RCB match : २७ एप्रिल रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२५ च्या ४६ व्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा ६ विकेट्सने पराभव केला आणि त्यांच्या मागील पराभवाचा बदला घेतला. या सामन्यानंतर विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोहली केएल राहुलला चिन्नास्वामी स्टेडियममध्ये केलेल्या कांतारा सेलिब्रेशनची आठवण करून देत आहे. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
विराटने कांतारा सेलिब्रेशनची करुन दिली आठवण –
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हरवल्यानंतर केएल राहुलचा सेलिब्रेशन व्हायरल झाले होते. ज्यामध्ये राहुलने आपल्या शानदार फलंदाजीमुळे दिल्लीला सामना जिंकवून दिल्यानंतर कांतारा शैलीत आपला आनंद साजरा केला. यानंतर तो चिन्नास्वामी हे माझे ग्राऊंड आहे. अशा प्रकारचे हावभाव करताना दिसला होता. आता विराट कोहलीने अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथील सामन्यानंतर केएल राहुलला कांतारा सेलिब्रेशनची आठवण करुन दिली.
Virat Kohli doing ‘This is my ground’ celebration in front of KL Rahul. 🤣#ViratKohli #RCBvDC #DCvRCBpic.twitter.com/kr5QyEbaMa
— Panda Heart🐼🖤 (@_vy_sh_navi) April 27, 2025
किंग कोहलीने राहुलला डिवचत घेतला बदला-
Virat Kohli doing KL Rahul’s ‘This is my ground celebrations’ and both smiling together. ❤️😀 pic.twitter.com/uQ9XnKqAKy
— Tanuj (@ImTanujSingh) April 28, 2025
अशा परिस्थितीत, रविवारी दिल्लीच्या घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून मागील हिशोब चुकता केला. सामन्यानंतर, दिल्लीचा लोकल बॉय विराट कोहली दिल्ली खेळाडू केएल राहुलकडे गेला आणि त्याला त्याच्या कांतारा शैलीतील सेलिब्रेशनची आठवण करून देताना दिसला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा – DC vs RCB : विराट-राहुलमध्ये लाइव्ह सामन्यात जुंपली; काय होतं कारण? पाहा VIDEO
यावरु चाहते असा अंदाज लावत आहेत की व्हिडिओमध्ये विराट कोहली राहुलला सांगत आहे की हे त्याचे ग्राऊंड आहे. अशा प्रकारे विराट कोहलीने केएल राहुलला डिवचत बदला घेतला, असे बोलले जात आहे. विराट कोहली हा दिल्लीचा रहिवासी आहे, तर केएल राहुल बंगळुरूचा रहिवासी आहे.