“मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे सहमतीने संबंध …” ; दत्तात्रय गाडेचा पोलिसांसमोर मोठा दावा?

Dattatreya Gade arrested । स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी गुनाट गावातून मध्यरात्री अटक केली. त्यानंतर त्याला स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकाने पुण्यात आणले. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याला आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, त्याने पोलिसांसमोर मोठा दावा केला आहे.
दत्तात्रय गाडेला सध्या लष्कर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले. तिथे त्याची चौकशी करण्यात आली. याठिकाणी पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा आणि पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील दाखल झाल्या आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी केली जाते आहेत.
अत्याचार केला नाही, आमचे सहमतीने संबंध Dattatreya Gade arrested ।
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता गाडेने पोलीस कोठडीत टाहो फोडला आहे. माझं चुकलं, मी पापी आहे, असे म्हणत तो रडत असल्याचे पुढे आले आहे. तसेच मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे सहमतीने संबंध झाले, असा दावाही त्याने पोलिसांसमोर केला असल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान, आता नेमके सत्य काय आहे हे चौकशीनंतर समोर येणार आहे.
कशी झाली दत्ता गाडेला अटक? Dattatreya Gade arrested ।
आरोपी दत्ता गाडे गुनाट गावातील उसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, १०० पोलीस, ड्रोन, श्वान पथकं गावात दाखल झाले होते. २५ एकर शेतात पहाणी करुनही आरोपी न सापडल्याने तेथील शोधमोहीम काही वेळ थांबवण्यात आली. यादरम्यान, जेवण आणि पाणी नसल्याने आरोपी दत्ता गाडे कासावीस झाला होता. त्यानंतर त्याने त्याच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन पाणी मागितले. त्यानंतर त्या नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.





