Dattatray Bharane: ९७ टक्के पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण – मंत्री भरणे
Dattatray Bharane:

Dattatray Bharane: दुष्काळ जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांमध्ये पिकांच्या नुकसानीचे सुमारे ९७ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित काम येत्या दोन ते चार दिवसांत पूर्ण होईल.
या संकटात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर अहवालातून पिकांच्या नुकसानीची व्याप्ती स्पष्ट होईल. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयांची जाहीर केलेली मदत मिळेल.
आपल्या सगळ्यांसमोर संकट आहे. या संकटाचा सर्वांनी मिळून सामना करायचा आहे. सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे भरणे यांनी सांगितले. दरम्यान, आगामी सहा ते सात महिने माणसांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही नियोजनात विचार केला जात असल्याचे भरणे यांनी सांगितले.





