Dasun Shanaka : संजू सॅमसन चेन्नईत अन् सॅम करन जखमी! राजस्थान रॉयल्सचं टेन्शन वाढलं असताना संगकारांनी शोधला मास्टर ‘रिप्लेसमेंट
Dasun Shanaka : आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्स (RR) संघात मोठे फेरबदल झाले आहेत

Dasun Shanaka joins Rajasthan Royals for IPL 2026 : आयपीएल २०२६ ची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या गोटातून एक वाईट आणि एक चांगली बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्समधून ट्रेड होऊन राजस्थानमध्ये आलेला सॅम करन दुखापतीमुळे यंदाचा हंगाम खेळू शकणार नाही. मात्र, त्याच्या जागी श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू दासुन शनाका याला २ कोटी रुपयांत संघात समाविष्ट करून राजस्थानने आपले नुकसान भरून काढले आहे.
सॅम करनचे दुर्दैव अन् शनाकाची एन्ट्री –
सॅम करनला राजस्थानने संजू सॅमसनच्या बदल्यात चेन्नईकडून रवींद्र जडेजासह आपल्या ताफ्यात घेतले होते. मात्र, दुखापतीमुळे तो बाहेर पडल्याने मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी निराशा व्यक्त केली आहे. “सॅमसारखा प्रतिभावान खेळाडू उपलब्ध नसणे हे दुर्दैवी आहे, पण दासुन शनाकाच्या रूपाने आम्हाला एक उत्तम फिनिशर आणि अष्टपैलू पर्याय मिळाला आहे,” असे संगकारा यांनी नमूद केले. शनाकाने आतापर्यंत १३१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३३५० हून अधिक धावा आणि ८६ विकेट्स घेतल्या आहेत.
PSL सोडून थेट IPL मध्ये दाखल!
🚨 DASUN SHANAKA OUT OF PSL FOR IPL 🚨
Dasun Shanaka has decided to choose the IPL over the PSL. He was picked by Lahore for PKR 2.2 Crore
He will replace Sam Curran in the Rajasthan Royals for INR 2 Crore 👏🏻
Another day, Another humiliation for PSL 😂pic.twitter.com/8WkRgBdnLO
— Fan Account Richard Kettlebourogh (@RichKettle07) March 22, 2026
विशेष म्हणजे, दासुन शनाका हा पाकिस्तान सुपर लीग (PSL) सोडून आयपीएलमध्ये सामील होणारा दुसरा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुजरबानीनेही असाच निर्णय घेतला होता. शनाका पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्सकडून खेळत होता, पण राजस्थान रॉयल्सचे बोलावणे येताच त्याने भारताकडे कूच केली आहे.
राजस्थान रॉयल्स आपल्या आयपीएल २०२६च्या मोहिमेची सुरुवात ३० मार्च रोजी गुवाहाटीमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध करणार आहे. संजू सॅमसन आता चेन्नईकडून खेळणार असल्याने आणि शनाका राजस्थानच्या लोअर मिडल ऑर्डरमध्ये आल्याने या सामन्यात मोठी चुरस पाहायला मिळेल.





